Leopard Safety Tips : अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं..? ; सुरक्षित राहण्यासाठी पाळा वनविभागाच्या 'या' सूचना

Tips to protect yourself from leopards : पुणे शहरातील औंध परिसरात बिबट्याचा वावर आ ढळल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
Forest Department issues crucial safety instructions explaining how to respond safely when a leopard suddenly appears, helping prevent human–wildlife conflicts.

Forest Department issues crucial safety instructions explaining how to respond safely when a leopard suddenly appears, helping prevent human–wildlife conflicts.

esakal

Updated on

What to Do When a Leopard Appears Suddenly: पुणे शहरातील औंध परिसरातील भागात २३ नोव्हेंबर रोजी बिबट्याचा वावर आढळून आला आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व रेस्क्यूचॅरिटेबल ट्रस्टचे टीम हे अविरतपणे थरमल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, डॉगस्कॉड यांच्या मदतीने तसेच पेट्रोलिंगद्वारे विविध भागात बिबट्याचा शोध घेत आहेत. परंतु त्या दिवशीनंतर ते अद्यापपर्यंत ठोस पुराव्यानिशी संबंधित भागात कोठेही बिबट्याचा वावर आढळून आलेला नाही. मात्र तरी वन्यजीव हालचालीबाबत सबळ पुराव्याविना कोणतेही भाकीत करणे हे उचित ठरत नाही. म्हणून या पार्श्वभूमीवर वनविभागामार्फत पुणे शहरातील विशेषतः टेकडी परिसर व इतर मोठ्याप्रमाणात संरक्षित प्रदेशात झाडोरा असणाऱ्या नागरिकांना वनविभागामार्फत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अचानक जर आपल्या समोर बिबट्या आला तर आपण नक्की काय करावे, कशाप्रकारे स्वत:चा जीव वाचवावा. बिबट्यापासून वाचण्यासाठी आधीच काय उपाययोजना कराव्यात याबाबत वन विभागाने नागरिकांसाठी अगदी सविस्तर सूचना जारी केल्या आहेत.

बिबट्यापासून संरक्षणासाठी नागरिकांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात -

1. पुणे शहरालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाताना समूहाने जावे. हातात काठी घेऊन, गळा व माने भोवती जाड रूमाल बांधून, मोबाईलवर गाणे वाजवीत जावे.

2. उघड्या जागेवर शौचास जाऊ नये.

3. शाळा वनक्षेत्रालगत असल्यास लहान मुलांनी समुहाने जावे किंवा पालकांनी सोबत असल्यास खबरदारी घेणे उचित ठरेल.

4. बिबट्या तसेच इतर वन्यप्राण्यांच्या बाबतीत चुकीच्या बातम्या, बनावट छायाचित्र व व्हिडीओ पसरवू नये. अपुष्ट व्हिडिओ / फोटो किंवा मेसेज सोशल मीडियावर forward करू नये.

5. रात्रीच्या वेळेस दरवाजे व्यवस्थितरीत्या लॉक लावून बंद करा. तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघडयावर झोपणे टाळावे.

6. रात्रीच्या वेळेस तसेच संध्याकाळी व पहाटे लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरीकांना बाहेर एकटे सोडू नका. बिबट्या रात्रीच्या वेळी सक्रिय असतो

7. बिबट्याचे वावर असलेल्या क्षेत्रातील लोकांनी आपले पाळीव जनावरे घराजवळ जाळीबंद बंदिस्त गोठ्यामध्ये बांधावीत, जेणेकरुन ते सुरक्षित राहतील. गोठ्यात प्रखर प्रकाश लावावा.

8. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा. अन्यथा भटक्या कुत्र्यांची व डुकरांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांच्याकडे आकर्षित होतो.

9. पाळीव कुत्रे, शेळ्या, मेंढ्या इ.रात्री मोकळे सोडू नका, त्यांना सुरक्षित बंधिस्त जागी ठेवा.

10. घराजवळ किंवा सोसायटी परिसरात मांसाचा कचरा, उरलेले मांस, हाडे, कत्तलखान्याचा कचरा उघड्यावर टाकू नये. यामुळे बिबट अशा भागात आकर्षित होऊ शकतो.

Forest Department issues crucial safety instructions explaining how to respond safely when a leopard suddenly appears, helping prevent human–wildlife conflicts.
Hema Malini emotional Post : ''धरमजी माझ्यासाठी खूप काही होते...'' ; हेमा मालिनी भावनिक पोस्ट करत पहिल्यांदाच झाल्या व्यक्त, म्हणाल्या...

11. एकटे दुर्गम जागी जाणे टाळा.

12. दाट झाडे, झुडपी भाग, नाले, ओढे, रिकामे प्लॉट, बांधकाम साइट्स यामधून एकट्याने जाणे, (विशेषतः रात्रीच्या वेळी, शक्यतो टाळावे.)

13. रात्री घराबाहेरील प्रकाश व्यवस्था नीट ठेवा

14.पहाटे/अंधारात घराबाहेर चालत असताना टॉर्चचा वापर करा,हातात घुंगराची काठी ठेवा, मोबाईलवर गाणे वाजवा.

15. सोसायटी, शाळा परिसर, सार्वजनिक रस्ते, शेताच्या/रिकाम्या प्लॉटच्या कडेला पुरेशी लाईटची व्यवस्था ठेवावी. शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे नीट कार्यरत ठेवावेत

16. झाडात/झाडीत लपून बसू नका. त्यामुळे बिबट्या तुम्हाला लहान प्राणी समजून तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता वाढते.

Forest Department issues crucial safety instructions explaining how to respond safely when a leopard suddenly appears, helping prevent human–wildlife conflicts.
Man Kissing Cobra Video : भयानक!!! बहाद्दरानं चक्क ‘कोबरा’लाच केला ‘Lip lock Kiss’ ; थरारक व्हिडिओ व्हायरल

अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं...? -

1. अजिबात घाबरु नका. उभे रहा, धावत सुटू नका, पाठ फिरवू नका. तुम्ही कितीही वेगाने पळाला तरीही बिबट्यापेक्षा जास्त वेगाने पळू शकणार नाहीत. पळणाऱ्या शिकारीचा पाठलाग करणे हा त्याचा नैसर्गिक स्वभाव असल्याने तो हल्ला करण्याची शक्यता वाढते.

2. बिबट्या जवळ असल्यास ओरडतच हळुहळु मागे सरका. बिबट्या दूर असल्यास शांतपणे हातवर करुन मागे हटा.

3. तुमचे दोन्ही हातवर उचला आणि जोरजोरात ओरडा, असे केल्याने, बिबट्याला तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे प्राणी असल्याचा भास होतो.

4. डोळ्यांत डोळे न पाहता हळू आवाजात बोलत किंवा आवाज करून मानवी उपस्थिती दाखवा.

5. प्राण्याला कोपऱ्यात गाठू नका; त्याला पळून जाण्यासाठी मोकळा रस्ता राहू द्या.

Forest Department issues crucial safety instructions explaining how to respond safely when a leopard suddenly appears, helping prevent human–wildlife conflicts.
Dharmendra Death-Hema Malini Photos : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींनी पहिल्यांदाच शेअर केले खास फोटो, तुम्ही पाहिलेत का?

वन विभागाचे आवाहन -

1.मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदार वर्तणूक ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या छोट्या सहकार्यामुळे बिबटास सुरक्षितपणे जंगलात पाठवणे आणि नागरिकांचेही रक्षण करणे शक्य होईल

2. वन विभागाकडून किंवा शासनाकडून अधिकृतरीत्या देण्यात येणारीच माहिती विश्वसनीय मानावी.

3. वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे

4. बिबट शोध व पकड मोहिमेदरम्यान वन विभाग, पोलीस किंवा स्थानिक प्रशासन ज्या सूचना देतील, त्या सर्वांनी सहकार्याने पाळाव्यात. आवश्यक असेल त्या भागात काही वेळ ये-जा बंद केली जाऊ शकते; त्या निर्णयाला पाठिंबा द्यावा.

Forest Department issues crucial safety instructions explaining how to respond safely when a leopard suddenly appears, helping prevent human–wildlife conflicts.
Fake Tiger and Real Tiger Viral Video : खतरनाक!!! वाघाचं कातडं पांघरून जंगलातील वाघाच्या तोंडासमोर गेला पठ्ठ्या अन् मग...

5. तसेच अशा प्रकारच्या कोणतीही माहिती मिळाल्यास १९२६ या क्रमांकावर संपर्क करून त्याबाबतची माहिती वनविभागास देण्यात यावी

या सूचनांचे पालन करून नागरिकांनी आपली आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा (पुणे) यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com