Congress : श्रीमंत आमदारांच्या बंधूंना उमेदवारी

पहिल्या यादीत देशातील दोन सर्वात श्रीमंत आमदारांच्या बंधूंना काँग्रेसने उमेदवारी दिली
काँग्रेस
काँग्रेसesakal

बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देशभरातील ३९ मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले. कर्नाटकातील सात मतदारसंघांसाठी उमेदवारही जाहीर केले. पहिल्या यादीत देशातील दोन सर्वात श्रीमंत आमदारांच्या बंधूंना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. ते दोघेही कर्नाटकातील आहेत हे विशेष.

काँग्रेस
Kitchen Tips : किचनमधील या वस्तू कधीच फेकून देऊ नका, कारण...

बंगळूर ग्रामीण, शिमोगा, तुमकूर, मंड्या, विजापूर, हावेरी आणि हासन मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पैकी बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचे डी. के. सुरेश आणि मंड्याचे वेंकटरामण गौडा ऊर्फ ​​स्टार चंद्रू हे ते श्रीमंत आमदारांचे भाऊ आहेत.

उपमुख्यमंत्री शिवकुमार देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १,४१३ कोटी रुपये आहे. त्यांचे भाऊ सुरेश यांना बंगळूर ग्रामीणसाठी उमेदवार आहेत. श्रीमंतांमध्ये गौरीबिदनूर येथील अपक्ष आमदार के. एच. पुट्टास्वामी गौडा हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १,२६७ कोटी रुपये आहे. त्यांनी सत्ताधारी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचे भाऊ व्यंकटरमण गौडा ऊर्फ ​​स्टार चंद्रू यांना मंड्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com