
नवी दिल्ली : उदारीकरण, खासगीकरण आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याबाबतच्या धोरणांमुळे डॉ. मनमोहनसिंग यांनी भारताच्या वेगवान आर्थिक विकासाचा पाया रचला, अशा शब्दात काँग्रेस पक्षाने डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळाचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचप्रमाणे त्यांचा आदर्श पुढे नेण्याचा संकल्पही काँग्रेसच्या कार्यकारिणीत करण्यात आला.