'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 20 जानेवारी 2019

राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही यावरून राज्य सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान त्यांना काडीचीही किंमत देत नाही हे उघड झाले आहे असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष 0गिरीश चोडणकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना हाणला.
 

गोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही यावरून राज्य सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान त्यांना काडीचीही किंमत देत नाही हे उघड झाले आहे असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष 0गिरीश चोडणकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना हाणला.

 खाण कायद्यात दुरुस्ती वा वटहुकूम केद्र सरकारला काढण्यास विनंती करू असे सांगून राज्य सरकारने दिशाभूल केली. माझ्या माहितीनुसार हल्लीच खाण मंत्रालयाने व पंतप्रधानांच्या कार्यालायतून राज्य सरकारला पत्रे आली आहेत व त्यामध्ये कायद्यात दुरुस्ती अशक्य असल्याचे तसेच वटहुकूम काढणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ही दोन्ही पत्रे दडपण्यात आली आहेत.

फेरयाचिका हा एकमेव पर्याय असल्याचे माहीत असूनही राज्य सरकार खाण अवलंबितांना खाणी सुरू होतील असे भूलवत राहिले व अंधारात ठेवले. लोकांना वेठीस धरून जाणूनबुजून फसवणूक केली. या सर्व प्रकाराची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून लोकांची माफी मागावी व पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी चोडणकर यांनी केली.

Web Title: Congress President Girish Chodankar Slams Goa State Governmet