राहुल गांधी यांचे राजघाट येथे आज उपोषण 

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : दलित अत्याचाराचा मुद्दा तापविण्याची रणनिती कॉंग्रेसने आखली असून त्याअंतर्गत कॉंग्रेसतर्फे आज (सोमवार) देशभरात लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी उद्या दिल्लीत महात्मा गांधींच्या समाधीस्थळी राजघाट येथे उपोषण करतील. तर पक्षाचे नेते, कार्यकर्ते प्रदेश आणि जिल्हा पातळीवर उपोषण करतील. 

कॉंग्रेसने सामाजिक सौहार्दासाठी देशभरात लाक्षणिक उपोषणाची गेल्याच आठवड्यात घोषणा केली होती. याअंतर्गत उद्या हे उपोषण होणार असून राहुल गांधी हे महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत उपोषण करतील. तर राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी तसेच जिल्हा मुख्यालयांवर पक्षाच्या प्रदेश शाखांतर्फे उपोषण केले जाईल. पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती सेलतर्फे 23 एप्रिलला दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअम येथे मेळावा होणार आहे. 

दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी बोथट करण्यावरून कॉंग्रेसतर्फे मोदी सरकारला आक्रमकपणे दलितविरोधी ठरविले जात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य केले जात असून दोन एप्रिलला दलित संघटनांच्या भारत बंदमधील हिंसाचारावरूनही कॉंग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केले होते. आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र सोडताना, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर वाकून नमस्कार करणे म्हणजेच दलितांचा आदर करणे आहे असे पंतप्रधानांना वाटते. पण संपूर्ण देशात दलितांशी जो व्यवहार केला जात आहे तो चिंताजनक असून यावर मोदी मात्र मौन आहे, असे शरसंधान केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com