सोनिया गांधी यांचा कमांडो बेपत्ता

वृत्तसंस्था
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

दोन दिवसांनंतरी तो परतला नाही तेव्हा चिंतीत होऊन घरच्या लोकांनी चौकशीसाठी "10, जनपथ' गाठले. राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे दिली

नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ या अधिकृत निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या "स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप'चा (एसपीजी) कमांडो गेल्या रविवारपासून बेपत्ता आहे.

कमांडो राकेश कुमार (वय 31) हा गेल्या शुक्रवारी कामावर होता. मात्र त्या दिवशी त्याची सुटी असूनही तो गणवेश परिधान करुन कामावर का आला होता, याचा तपास पोलिस करीत आहेत. शुक्रवारी मित्राला भेटल्यानंतर राकेशने सकाळी 11 वाजता सोनियांचे निवासस्थान सोडले. बाहेर पडताना त्याने स्वतःचे रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल फोन तेथेच ठेवून दिला होता. त्यामुळे पोलिस किंवा कुटुंबातील सदस्यांचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पत्नी व दोन मुलांसह राकेश दिल्लीतील द्वारका भागात भाड्याच्या घरात राहतो.

राकेशचा संपर्क शनिवारी होऊ शकला नाही, तेव्हा तो जादा कामासाठा थांबला असावा, असे कुटुंबीयांना वाटले. रविवारीही संपर्क होऊ न शकला नाही. तेव्हा तो कामासाठी दूर कोठेतरी गेला असावा जेथे मोबाईल कनेक्‍शन मिळत नाही, असा समज त्यांचा झाला. मात्र दोन दिवसांनंतरी तो परतला नाही तेव्हा चिंतीत होऊन घरच्या लोकांनी चौकशीसाठी "10, जनपथ' गाठले. राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे दिली. याचा तपास सुरु असून अद्याप काहीही माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Congress President Sonia Gandhi's SPG commando goes missing