सिद्धूंशी मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही 'डील' नाही- अमरिंदर सिंग

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

"संपूर्ण प्रचार मोहीम मी राबवत आहे आणि तरीही तुम्ही मला हा प्रश्न विचारत आहात," असे अमरिंदर सिंग मिश्कीलपणे म्हणाले. 

चंडीगड- नकुतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी कोणतेही 'डील' झालेले नाही, असे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.
पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल हे काँग्रेस अध्यक्ष ठरवतील, असे त्यांनी सांगितले. 

पटियालामध्ये अमरिंदर सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसने निवडणुका जिंकल्यास सिद्धू यांना एखादे महत्त्वाचे पद देणार आहात का असे विचारले असता ते म्हणाले, "नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी काहीही ठरलेलं नाही. काँग्रेस कोणाशीही असे 'डील' करत नाही."

तसेच, सिद्धू हेदेखील त्याबाबत काही बोलले नाहीत, असे त्यांनी सांगितले. 
सिद्धू हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का असे विचारले असता ते म्हणाले, "ते मला माहीत नाही. तो काँग्रेस अध्यक्षांचा निर्णय असेल."

"संपूर्ण प्रचार मोहीम मी राबवत आहे आणि तरीही तुम्ही मला हा प्रश्न विचारत आहात," असे सिंग मिश्कीलपणे म्हणाले. 
 

Web Title: Congress president to take decision on CM candidate: Amarinder