esakal | राहुलच काँग्रेसला बुडवतायत; आम्हाला काहीही करण्याची गरज नाही - BJP
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

राहुलच काँग्रेसला बुडवतायत; आम्हाला काहीही करण्याची गरज नाही - BJP

sakal_logo
By
सुधीर काकडे

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यापासून पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेली परिस्थिती ही सध्या देशातील राजकीय वर्तुळातील चर्चांच्या केंद्रस्थानी आहे. नवज्योत सिंग सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या नाराजी नाट्यामुळे रोज वेगवेळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे. राहुल गांधी जोपर्यंत काँग्रेसमध्ये आहेत, तोपर्यंत आम्हाला काही करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

पंजाबमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये सध्या मोठी खळबळ सुरू असल्याचे दिसते आहे. यावर बोलताना शिवराज सिंग चव्हाण यांनी राहुल गांधी हे पक्षाला बुडवत असल्याची टीका केली. पंजाबमध्ये चांगलं प्रस्थापित असलेल्या सरकार बरखास्त केलं, सिद्धूंसाठी अमरिंदर सिंग यांना पद सोडायला लावले, नंतर सिद्धूही पळून गेले असे म्हणत त्यामुळे राहुल गांधी आहेत तोपर्यंत आम्हाला काहीही करण्याची गरज नााही, तेच पक्षाला बुडवत असल्याची टीका मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी केली आहे.

हेही वाचा: मोदी भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा संबंध तोडत आहेत - राहुल गांधी

दरम्यान, काँग्रेसची सध्याची परिस्थिती चिंताजनक असून, पक्ष कधीही अशा परिस्थितीत नव्हता असे म्हणत ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच जी-२३ कडून लवकरच सोनिया गांधींना पत्र लिहीणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

loading image
go to top