राहुल गांधींनी पहिल्यांदा मजुरांची व्यथा ऐकली अन् आता शेअर केली, चर्चा तर होणारच...

टीम ई-सकाळ
Saturday, 23 May 2020

खुद्द राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केलाय.  काँग्रेसचे नेता राहुल गांधी लॉकडाउनदरम्यान मजुरांच्या समस्याकडे सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना दिसले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी लॉकडाउनच्या दरम्यान मजुरांची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीची चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता राहुल गांधी यांचा मजुरांसोबतच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. खुद्द राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केलाय.  काँग्रेसचे नेता राहुल गांधी लॉकडाउनदरम्यान मजुरांच्या समस्याकडे सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना दिसले आहेत.

दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत मेच्या  अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या

देशातील मजुरांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या मुद्यावरुन त्यांनी मोदी सरकारवर शाब्दिक तोफही डागल्याचे पाहायला मिळाले. पण केवळ सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवून ते थांबले नाहीत तर प्रत्येक्षात मजुरांची भेट घेऊन त्यांनी मजुरांना दिलासाही देण्याचे व्रत हाती घेतल्याचे संबंधित व्हिडिओतून पाहायला मिळते. कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला. या निर्णयाशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता हे खरे असले तरी मजुरांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. लॉकडाउनच्या निर्णयामुळे बेरोजगार झालेला मजुरावर आपापल्या घरी जाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली. परदेशात अडकलेल्यांना विमाने पाठवणाऱ्या मोदी सरकारने देशातील मजूरांकडेही लक्ष द्यावे, असा मुद्दा काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला.

कर्नाटक राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका वेळेत घ्या; विरोधी पक्षाची मागणी

दरम्यान 16 मे रोजी सुखदेव विहा फ्लायओव्हर जवळ राहुल गांधी यांनी पायपीट करणाऱ्या मजुरांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी जो व्हिडिओ शेअर केलाय तो जवळपास 17 मिनिटांचा असून यात मजुरांच्या व्यथा दिसून येतात.  या व्हिडिओत राहुल गांधी एका मजूराला तुम्ही काय काम करत होता? असा प्रश्न विचारत त्याच्या व्यथा जाणून घेताना पाहायला मिळते. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नावर संबंधित मजूर हरियाणावरुन आल्याचे सांगत बांधकाम क्षेत्राशी निगडीत मोलमजूरी करत असल्याची माहिती देतो. अचानक लॉकडाउनची माहिती मिळाल्यामुळे तारंबळ उडाल्याचेही मजुराने राहुल गांधींशी बोलतान सांगितले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress rahul gandhi migrant workers haryana jhansi up coronavirus lockdown Video