आमदार खरेदीसाठी भाजपकडून प्रयत्न काँग्रेसकडून ऑडियो क्लिप सादर 

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

कर्नाटक काँग्रेसने आरोप केला आहे की, जनार्दन रेड्डी हे काँग्रेस आमदारांना खरेदी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी काँग्रेस आमदारांना मंत्रिपदाची आणि पैशाची ऑफर देऊ केली आहे. काँग्रेस आमदारांना तसे फोन कॉल करण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेस पक्षाने त्यासंरदर्भात एक ओडियो क्लिप सादर करण्यात आली आहे. तसेच हा आमदारांचा घोडेबाजार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सहमतीने चाललेला आहे असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 
 

नवी दिल्ली - कर्नाटक काँग्रेसने आरोप केला आहे की, जनार्दन रेड्डी हे काँग्रेस आमदारांना खरेदी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी काँग्रेस आमदारांना मंत्रिपदाची आणि पैशाची ऑफर देऊ केली आहे. काँग्रेस आमदारांना तसे फोन कॉल करण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेस पक्षाने त्यासंरदर्भात एक ओडियो क्लिप सादर करण्यात आली आहे. तसेच हा आमदारांचा घोडेबाजार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सहमतीने चाललेला आहे असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

काँग्रेसने प्रसारमाध्यमांसमोर सादर केलेल्या ऑडियो क्लिपमध्ये जनार्धन रेड्डी हे रायचूर ग्रामीममधील काँग्रेस आमदारासोबत बोलत आहेत. या प्रकरणावर भाजपने ही बनावट ओडियो क्लिप असल्याचे स्पष्ट केले आहे त्याचबरोरबर काँग्रेस अशा स्वरुपातील ओडियो क्लिप सादर करुन गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रतिआरोपही भाजपने केला आहे. 

भाजपने यावेळी, काँग्रेसने मिमिक्री कलाकाराकडून करुन घेतलेला हा प्रकार आहे असेही भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 'प्रिय काँग्रेस, ज्या मिमिक्री कलाकाराने हे काम केले आहे ते अत्यंत चांगले केले आहे तुम्ही आम्हाला त्या मिमिक्री कलाकाराचे नाव सांगा आम्हीही सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी यांचे टेप तयार करु'. अशा आशयाच्या ट्विटद्वारे भाजपने या प्रकरणावर काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.

Web Title: Congress releases audio clip