राजस्थानमध्ये 24 पासून  काँग्रेसची संकल्प रॅली 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

जयपूर : राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार, अराजकता, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीत झालेली वाढ या मुद्द्यांवर राजस्थान कॉंग्रेसने "संकल्प रॅली' काढण्याचा निर्णय घेतला आहे. 24 ऑगस्ट रोजी पहिली संकल्प रॅली काढण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात करण्यात आली होती. "संकल्प रॅली' हा निवडणूक प्रचाराचाच एक भाग आहे. 

राजस्थानमध्ये याच वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शो आणि पक्षाच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात "संकल्प रॅली' काढणार आहोत. भाजपने राज्यातील जनतेकडे दुर्लक्ष केले असून, आता "राजस्थान गौरव यात्रे'च्या माध्यमातून ते आपला जनाधार परत मिळविण्याचा असफल प्रयत्न करीत आहेत, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी सांगितले.

येत्या 24 ऑगस्ट रोजी चित्तोडगड जिल्ह्यात पहिली "संकल्प रॅली' होणार असून, त्यानंतर 28 ला चुरू, पाच सप्टेंबरला बारमेर, 10 सप्टेंबरला करौली आणि 12 सप्टेंबरला नागौर येथे संकल्प रॅली काढण्यात येणार आहे. 

Web Title: Congress Resolution of 24 from Rajasthan