शीखविरोधी दंगलीप्रकरणी सज्जनकुमारांना जन्मठेप 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

सज्जन कुमार यांना या प्रकरणी दोषमुक्त करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज (सोमवार) दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय देत त्यांना दोषी ठरविले. उच्च न्यायालयाने 29 ऑक्‍टोबरला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती.

नवी दिल्ली : 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगली प्रकरणातून काँग्रेस नेते सज्जनकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सज्जन कुमार यांना या प्रकरणी दोषमुक्त करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज (सोमवार) दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय देत त्यांना दोषी ठरविले. उच्च न्यायालयाने 29 ऑक्‍टोबरला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती. सीबीआय, दंगलपीडित आणि दोषींनी याचिका दाखल केल्या होत्या. सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज निकाल दिला.

न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावत 5 लाखांचा दंडही ठोठावला. सज्जनकुमार यांना 31 डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. सज्जनकुमार यांच्यावर दंगल भडकावल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. 31 ऑक्टोबर 1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर 1 नोव्हेंबरला दिल्ली छावणी भागात झालेल्या दंगलीत पाच जणांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Congress Sajjan Kumar Gets Life Term In 1984 Anti-Sikh Riots