Congress Seat Allocation : 15 उमेदवार खुल्या प्रवर्गातले, 24 उमेदवार मागास प्रवर्गातले; उमेदवारांची वयं किती? काँग्रेसने सगळंच स्पष्ट केलं

Rahul Gandhi Loksabha Election : काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केली आहे. यामध्ये छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मेघालय, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा येथील जागांचा समावेश आहे.
congress sonia gandhi rahul gandhi
congress sonia gandhi rahul gandhiesakal

Rahul Gandhi Loksabha Election : काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केली आहे. यामध्ये छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मेघालय, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा येथील जागांचा समावेश आहे.

३९ उमेदवारांच्या यादीमध्ये १५ उमेदवार हे ओपन कॅटेगिरीमधून आहेत, २४ उमेदवार हे एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्यक प्रवर्गातून आहेत. तर १२ उमेदवार हे ५० वर्षे वयाच्या आतील असून ८ उमेदवार हे ५० ते ६० या दरम्यानच्या वयातील आहेत.

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमध्ये १२ उमेदवार हे ६१ ते ७० या वयोगटातील आहेत. आणि ७ उमेदवार हे ७१ ते ७६ वयोगटातील आहेत. पक्षाचे जनरल सेक्रेटरी केसी वेणुगोपाल यांनी याबद्दल माहिती दिली. केरळमध्ये काँग्रेसने सर्वाधिक उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

अपेक्षेप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वायनाड याच मतदारसंघाला पसंती दिली आहे. केरळमधील जवळपास सर्वच उमेदवारांची नावे काँग्रेसने घोषित केली आहेत. यामध्ये विशेष म्हणजे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना अलपुझ्झा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

वेणुगोपाल यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते ए. एम. आरिफ यांच्याशी त्यांची थेट लढत होण्याची शक्यता आहे. वेणुगोपाल सध्या राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. याशिवाय ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांनी तिरुअनंतपुरम येथून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा मुकाबला आता केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांच्याशी होणार आहे. केरळमधून राम्या हरदास, हिबी एडन, के. सुधाकरन, के. मुरलीधरन, डीन कोरईकोस, के. सुरेश, अँटो अँटोनी या विद्यमान खासदारांवर पक्षाने पुन्हा विश्वास दाखविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com