पर्रिकर यांच्या विरोधात काँग्रेसकडून अपात्रता याचिका?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारताच्या अँटॉर्नी जनरलना पाठवलेल्या नोटिशीचा संदर्भ घेऊन गोवा प्रदेश काँग्रेस पर्रिकर यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करण्याचा विचार करत आहे.

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्या नंतरही राज्यसभा सद्स्यत्व न सोडल्याने गोवा प्रदेश काँग्रेस त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करण्याचा विचार करत आहे.

यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता सुनील कवठणकर यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील लोकसभा सद्स्यत्व सोडलेले नाही. 

यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारताच्या अँटॉर्नी जनरलना पाठवलेल्या नोटिशीचा संदर्भ घेऊन गोवा प्रदेश काँग्रेस पर्रिकर यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करण्याचा विचार करत आहे.

Web Title: Congress seeks disqualification of Goa CM Manohar Parrikar