जब लडेंगी प्रियांका गांधी...

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नवी दिल्लीः प्रियांका गांधी आँधी हैं… दुसरी इंदिरा गांधी हैं, दहन करो मोदी की लंका… बहन प्रियांका, बहन प्रियांका, हिंद की शेरणी, हिंदोस्तान की आवाज… प्रियांका प्रियांका.., अब आएगी असली आँधी जब लगेंडी प्रियांका गांधी... अशा प्रकारचे पोस्टर्स काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले असून, सोशल मीडियावर ते व्हायरल झाले आहेत.

नवी दिल्लीः प्रियांका गांधी आँधी हैं… दुसरी इंदिरा गांधी हैं, दहन करो मोदी की लंका… बहन प्रियांका, बहन प्रियांका, हिंद की शेरणी, हिंदोस्तान की आवाज… प्रियांका प्रियांका.., अब आएगी असली आँधी जब लगेंडी प्रियांका गांधी... अशा प्रकारचे पोस्टर्स काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले असून, सोशल मीडियावर ते व्हायरल झाले आहेत.

प्रियांका गांधी-वद्रा यांची बुधवारी (ता. 23) काँग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत अनौपचारिक किंवा अंशतः राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेल्या प्रियांका यांचे सक्रिय राजकारणातले हे अधिकृत पदार्पण मानले जाईल. त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या विभागातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचा समावेश होतो ही उल्लेखनीय बाब आहे. लोकसभेची निवडणूक प्रियांका गांधी लढविणार की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह असले तरी ती शक्‍यता नाकारता येत नसल्याचे काँग्रेस वर्तुळातून सूचित करण्यात आले.

प्रियांका यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर तसेच रायबरेलीमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत ‘प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ’ अशा घोषणा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता प्रियांका गांधीच्या नियुक्तीनंतर नवीन घोषणा तयार केल्या आहेत. सेलिब्रेशनमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते या नवीन घोषणा देताना दिसून आले. त्यापैकी काही घोषणांमध्ये प्रियांकांची तुलना थेट त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्याशी करण्यात आली आहे तर काही घोषणांमध्ये प्रियांका थेट मोदींना आवाहन देतील असेही पोस्टर्स तयार करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या घोषणांचे पोस्टर्स तयार करून ते लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

घोषणा पुढीलप्रमाणे-

  • प्रियांका गांधी आँधी हैं… दुसरी इंदिरा गांधी हैं
  • दहन करो मोदी की लंका… बहन प्रियांका, बहन प्रियांका...
  • हिंद की शेरणी, हिंदोस्तान की आवाज… प्रियांका प्रियांका..
  • अब आएगी उत्तर प्रदेश में काँग्रेस की जीत की आंधी, क्योंकि आ गई हैं प्रियांका गांधी...
  • अब आएगी असली आँधी जब लडेंगी प्रियांका गांधी
  • प्रियांका गांधी आयी है नई रौशनी लायी है
Web Title: congress slogans welcome priyanka gandhis entry into politics viral posters