काँग्रेस, सपा-बसपा एकत्र आले तरी आपण अजिंक्य ठरू; शहांनी थोपटली योगींची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस, सपा-बसपा एकत्र आले तरी आपण अजिंक्य ठरू: अमित शहा

काँग्रेस, सपा-बसपा एकत्र आले तरी आपण अजिंक्य ठरू: अमित शहा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वाराणसी: पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या तयारीसाठी गृहमंत्री अमित शहा यांनी आता कंबर कसली आहे. कालपासून त्यांचा हा यूपी दौरा सुरु झाला असून ते काल वाराणसीमध्ये होते. दोन दिवसाच्या आपल्या दौऱ्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचे प्रयत्न ते करणार आहेत. काल त्यांनी वाराणसीमध्ये संघटनात्मक बैठक घेत येऊ घातलेल्या यूपी विधानसभेच्या विजयासाठी हुंकार भरला. या बैठकीत शहा यांनी म्हटलंय की, काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी जरी एकत्र आले तरीही ते भाजपला पराभूत करु शकणार नसल्याचं विधान त्यांनी केलंय.

हेही वाचा: पाकमुळे अडलेला भारताचा गहू अफगाणकडे जाणार? खान म्हणतात, 'माणुसकीने विचार केला तर...'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांनी योगी आदित्यनाथ सरकारचं कौतुक केलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था, माफियांविरुद्ध कारवाई आणि आदित्यनाथ सरकारची अनुकूलता या महामारीच्या काळात आरोग्य सेवेचे व्यवस्थापन करण्याबाबत शहा यांनी योगींची पाठ थोपटली आहे. शहा यांनी सांगितलंय की, प्रत्येक सरकारला अँटी-इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतो. मात्र, सध्या प्रो-इन्कम्बन्सी मूड अधिक मजबूत आहे.

हेही वाचा: संप मिटविण्याच्या हालचालींना वेग

2022 च्या यूपी निवडणुकीचे निकाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असंही शाह यांनी मेळाव्यातील कार्यकर्त्यांना सांगितलंय. दिल्लीतील विजयाचा मार्ग याच राज्यातून जात असल्याने सर्वांच्या नजरा यूपीकडे लागल्याचे ते म्हणालेत. 2017 मध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विधानसभेच्या 325 जागा जिंकल्या होत्या. शुक्रवारी शहा यांनी यूपी भाजपला मोठ्या विजयासाठी काम करण्यास सांगितलंय.

loading image
go to top