ST Strike: संप मिटविण्याच्या हालचालींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st strike

संप मिटविण्याच्या हालचालींना वेग

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्यासाठी सरकार पातळीवर हालचालींना वेग आला आहे. आज प्रवाशांचे हाल थांबविण्यासाठी काही शहरांमध्ये शिवनेरी आणि खासगी गाड्या सोडण्याचा प्रयत्न झाला पण स्थानिक पातळीवर विरोध होताच त्याही थांबविण्यात आल्या. मात्र, सुमारे दीड हजार कर्मचारी कामावर परतल्याचे एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी सांगितले.

विलिनीकरणाच्या मागणीवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने यापूर्वीच कार्यवाही केलेली असताना देखील त्याच मागणीसाठी अडवणूक केली जात आहे. मात्र आपण उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच पुढे जाणार आहोत, असे परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

कर्मचारी परतण्यास सुरुवात

औद्योगिक न्यायालय आणि उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा ठरवल्याने महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. संप मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब तसेच एसटी महामंडळानेही वर्तमानपत्रांमधून कर्मचाऱ्यांना भावनिक साद घातल्यानंतर कर्मचारी कर्तव्यावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभरात आतापर्यंत १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले असून विविध आगारातून ३६ गाड्या धावल्या, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

दरम्यान, एसटीचा संप लांबल्यास प्रवाशांच्या सुविधेसाठी महामंडळ नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याच्या पर्यायाचा देखील विचार करू शकते आणि उद्यापर्यंत हा संप मिटविण्यात आला नाही तर महामंडळ अधिक कडक कारवाई करणार असल्याचा इशारा परब यांनी दिला आहे.

परिवहनमंत्री परब यांनी आज सायंकाळी याच मुद्यावरून कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा विषय गंभीर असल्याने राज ठाकरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे हे रुग्णालयांत असल्याने राज यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. पवार हेच यावर मार्ग काढतील अशी आशा आहे.

- बाळा नांदगावकर, नेते मनसे

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

शरद पवार - राज ठाकरे यांच्यात चर्चा

‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.१२) एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मुद्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. इतर महामंडळाप्रमाणे या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्यावर चर्चा झाली.

कामगारांची मागणी चुकीची आहे. संपाला चिथावणी देणारे भाजप नेते कामगारांचे नुकसान भरून देणार आहेत का?

-अनिल परब, परिवहनमंत्री

loading image
go to top