उत्तर प्रदेश निवडणुकीत कॉंग्रेस-'सप'ने एकत्र यावे

उज्ज्वल कुमार; सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

पाटणा : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने एकत्र येण्याची जरूरत असल्याचे मत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केले आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जातीयवादी भाजपला पराभूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत देताना लालूप्रसाद यादव बोलत होते. ते म्हणाली, की हिंदी भाषिक पट्ट्यात उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक ही महत्त्वाची आहे आणि त्यात भाजपला पराभूत करणे गरजेचे असून, त्यासाठी या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे.

नोंटाबंदीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना लालूप्रसाद यादव म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीद्वारे संपूर्ण देशाला अपसेट केले आहे. ते कोणतेच काम करू शकत नाहीत हे आता जनतेला समजू लागले आहे. काळा पैसा आणण्यात केंद्र सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. येत्या जानेवारीत आम्ही नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. नोटाबंदीमुळे जनतेला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आमची महाआघाडी अतूट असल्याचे लालूप्रसाद यांनी स्पष्ट केले. नोटाबंदीसंदर्भात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेले विधान म्हणजे केंद्राचे केलेले समर्थन आहे, असे समजू नये असे ते म्हणाले. नितीश कुमार यांच्या विधानाने महाआघाडीत कोणतीही फूट पडली आहे असे समजू नये.
नितीश कुमार यांचा पक्षही नोटाबंदीच्या विरोधात आहे. पंतप्रधानांनी याबाबत 50 दिवसांची मुदत मागितली आहे. नोटाबंदीमुळे होणाऱ्या समस्येबाबत भाजपमध्येच अंतर्गत मतभेद आहेत, असे ते म्हणाले.
पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने आपल्याला निर्दोष ठरविले आहे. आपण उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविलेली नाही हे न्यायालयाने मान्य केले आहे. राहुल गांधी यांनी तारखेप्रमाणे मोदी यांना कोणत्या कंपनीकडून किती पैसे मिळाले आहेत हे स्पष्ट केले आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी त्याचे उत्तर देणे गरजेचे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress sp should come together