प्रचारासाठी काँग्रेसचा तीन महिन्यांत 56 कोटींचा खर्च 

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

बंगळूर : कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच राज्यातील काँग्रेस सरकारने तीन महिन्यांत जाहिरातींवर तब्बल 56 कोटी रुपयांचा खर्च केल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी बस, मेट्रोचे खांब, रिक्षांवर पोस्टर्स आणि फलक लावले आहेत. याशिवाय, डिजिटल मीडियामध्येही जाहिरातींचा भडीमार करण्यात आला आहे. यासाठी वेगळा खर्च करण्यात आला. 

कर्नाटकमध्ये येत्या 12 मे रोजी मतदान आहे. त्यापूर्वी प्रचाराचे वातावरण तापले आहे. माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीतून समोर आलेल्या या तपशीलांसंदर्भात 'फर्स्टपोस्ट'ने बातमी प्रसिद्ध केली आहे. आतापर्यंतच्या प्रचारामध्ये दररोज एक कोटी रुपये खर्च झाले आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सूचना आणि प्रसारण मंत्रालयासाठी 280 कोटी रुपयांचा निधी दिला होता. 

भाजपने या खर्चावर कडाडून टीका केली आहे. 'ज्या योजनांची अद्याप अंमलबजावणी सुरूही झालेली नाही, त्यांच्या जाहिरातींवरही सरकार खर्च करत आहे. काँग्रेसच्या प्रचारासाठी या सरकारने 600 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. हा खर्च जनतेच्या पैशांतून नव्हे, तर काँग्रेसनेच केला पाहिजे', अशी भूमिका भाजपचे प्रवक्ते एस. प्रकाश यांनी मांडली. यावर काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले आहे. 'सरकारच्या कामाच्या प्रसिद्धीसाठी पूर्ण वर्षासाठी निधी दिला जात असतो. सध्या केलेला खर्च मर्यादेपेक्षा जास्त नाही. काँग्रेसने आचारसंहितेचे उल्लंघन केलेले नाही', असे स्पष्टीकरण खासदार नासीर हुसेन यांनी दिले.

Web Title: Congress spent 56 cr in three months for Karnataka elections