...तरीही काँग्रेसला ईव्हीएमबाबत शंकाच

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

गेल्या निवडणुकांत ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने आता तेलंगणामध्ये पराभवानंतर ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

हैदराबाद : गेल्या निवडणुकांत ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने आता तेलंगणामध्ये पराभवानंतर ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) सर्वाधिक 87 जागा मिळूवन सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. काँग्रेस आणि टीडीपी यांची याठिकाणी आघाडी होती. मात्र, यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसने निकालावर प्रश्न उपस्थित करत ईव्हीएमवर शंका घेतली आहे.

तेलंगणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उत्तर कुमार रेड्डी म्हणाले, की माझा या निकालावर संशय आहे. ईव्हीएमबाबत छेडछाड झाली असून, व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मिळालेल्या चिठ्ठ्यांची मोजणी झाली पाहिजे. निवडणूक आय़ोगाकडे याबाबत तक्रार करणार आहे.

Web Title: Congress still raised question on EVM machine