esakal | काँग्रेस प्रवक्ते आज टीव्ही डिबेट शो मध्ये दिसणार नाहीत कारण...

बोलून बातमी शोधा

congress flag
काँग्रेस प्रवक्ते आज टीव्ही डिबेट शो मध्ये दिसणार नाहीत कारण...
sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यावेळी टीव्ही वर होणाऱ्या डिबेट शो मध्ये तुम्हाला काँग्रेसचा एकही प्रवक्ता दिसणार नाही. देशात सध्या कोरोना व्हायरसमुळे गंभीर स्थिती आहे. त्यामुळे निवडणुकी संदर्भातील टीव्ही डिबेट शो मध्ये पक्षाचा एकही प्रवक्ता सहभागी होणार नाही, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले. आज तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी आणि केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे.

हेही वाचा: Pandharpur Elections 2021: दहाव्या फेरीअखेर समाधान आवताडे आघाडीवर

"सध्या देश अभूतपूर्व अशा संकटाचा सामना करत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार दिशाहीन झाले आहे. अशावेळी निवडणुकीतील जय-पराजयाबद्दल चर्चा करण्याऐवजी आमचे प्रवक्ते निवडणूक डिबेट शो मधील चर्चेत सहभागी होणार नाहीत" अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी टि्वट करुन दिली.

"प्रसारमाध्यमांमधील मित्रांना हव्या असलेल्या कुठल्याही प्रतिक्रियेसाठी आम्ही उपलब्ध आहोत. आम्ही जिंकू किंवा हरु, पण या प्रसंगी लोक ऑक्सिजन, बेड्स, औषधं आणि व्हेंटिलेटर्ससाठी फिरत आहेत. त्यांच्यापाठिशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे" असे दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.