Pandharpur Elections : पंढरपूरमध्ये कमळ फुलले ! समाधान आवताडे विजयी

मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Awtade
AwtadeCanva

सोलापूर : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस पोस्टल मतांनी सुरवात झाली आहे. यानंतर ईव्हीएम मशिनवरील मतमोजणीस सुरवात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणीस सुरवात झाली आहे. मतमोजणी पूर्ण होण्यास सायंकाळी साडेसात ते आठ वाजतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

  • पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या रूपाने या मतदारसंघात कमळ फुलले आहे. आवताडे विजयी झाल्याचे निश्‍चित झाल्याने विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला. या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे व समाधान आवताडे यांचे बंधू सिद्धेश्‍वर आवताडे यांच्यासह इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

    भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना एकूण 1,09,450 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1,05,717 मते मिळाली आहेत.

  • अवघ्या काहीच फेऱ्यांमध्ये आघाडी घेतलेल्या भगीरथ भालके यांना मागे सारून सलग फेऱ्यांमध्ये मतांची आघाडी घेतलेले भाजपचे समाधान आवताडे यांनी 36व्या फेरीअखेर मतांची आघाडी कायम राखली असून, त्यांना 36व्या फेरीत 1,04,285 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1,00,183 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 4,102 मतांची आघाडी घेतली आहे. आणखी काही फेऱ्यांचीच मोजणी शिल्लक असून, अवताडे यांचा विजय पक्का झाल्यातच जमा आहे.

  • मतांची आघाडी घेतलेले भाजपचे समाधान आवताडे यांनी 35व्या फेरीअखेर मतांची आघाडी कायम राखली असून, त्यांना 35व्या फेरीत 1 लाख 1,01,607 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 97,212 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 4,395 मतांची आघाडी घेतली आहे. आणखी काही फेऱ्यांमध्ये आवताडेंनी लीड कायम ठेवल्यास त्यांचा विजय फायनल असेल.

  • सलग फेऱ्यांमध्ये मतांची आघाडी घेतलेले भाजपचे समाधान आवताडे 30व्या फेरीअखेर मतांची आघाडी कायम राखली असून, त्यांना 30व्या फेरीत 89037 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 82127 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 6910 मतांची आघाडी घेतली आहे. आणखी काही फेऱ्यांमध्ये आवताडेंनी लीड कायम ठेवल्यास त्यांचा विजय फायनल असेल.

  • 27व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी मतांची आघाडी घेतली आहे व ती कायम आहे. त्यांना 27व्या फेरीत 80557 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 73925 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 6632 मतांची आघाडी घेतली आहे.

मंगळवेढा शहरी भागातील मतमोजणीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना मागे टाकत 24व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी मतांची घेतली आहे व ती कायम आहे. त्यांना 24व्या फेरीत 71584 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 65528 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 6056 मतांची आघाडी घेतली आहे.

  • मंगळवेढा शहरी भागातील मतमोजणीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना मागे टाकत 23व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी मतांची घेतली आहे व ती कायम आहे. त्यांना 23व्या फेरीत 68602 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 62974 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 5628 मतांची आघाडी घेतली आहे.

  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना मागे टाकत बाविसाव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी मतांची घेतली आहे व ती कायम आहे. त्यांना बाविसाव्या फेरीत 64810 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 60864 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 3946 मतांची आघाडी घेतली आहे.

  • सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेतलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना मागे टाकत एकविसाव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी मतांची घेतली आहे व ती एकविसाव्या फेरीअखेर कायम आहे. त्यांना एकविसाव्या फेरीत 62056 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 58809 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 3247 मतांची आघाडी घेतली आहे.

  • सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेतलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना मागे टाकत विसाव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी मतांची घेतली आहे व ती विसाव्या फेरीअखेर कायम आहे. त्यांना विसाव्या फेरीत 58787 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 57046 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 1741 मतांची आघाडी घेतली आहे.

  • एकोणिसाव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांची मतांची आघाडी कायम आहे. त्यांना 55559 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 54664 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 895 मतांची आघाडी घेतली आहे.

  • अठराव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी मतांची आघाडी कायम ठेवली आहे असून,. त्यांना 52450 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 51384 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 1066 मतांची आघाडी घेतली आहे.

  • सतराव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी मतांची आघाडी कायम ठेवली आहे. त्यांना 49122 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 48367 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 755 मतांची आघाडी घेतली आहे.

  • सोळाव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी कमी मतांची का होईना आघाडी कायम ठेवली आहे. त्यांना 45934 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 44706 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 1228 मतांची आघाडी घेतली आहे.

  • दहाव्या फेरीअखेर समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे समाधान आवताडे यांना 28885 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 27047 मते मिळाली असून, समाधान आवताडे यांनी 1838 मतांची आघाडी घेतली आहे.

  • * सातव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे पीछाडीवर पडले असून, समाधान आवताडे यांनी आता आघाडी घेतली आहे. भाजपचे समाधान आवताडे यांना 20213 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 19380 मते मिळाली असून, समाधान आवताडे यांनी 833 मतांची आघाडी घेतली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांना गुलाल उधळायला व जल्लोष करायला बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राकडे कोणालाही फिरकायला परवानगी नाही. मतमोजणी केंद्रात कोव्हिड टेस्ट केलेला रिपोर्ट असेल व केंद्रात प्रवेशाची परवानगी घेतलेली असेल तरच प्रवेश दिला जात आहे. मंगळवेढा संपूर्ण तालुका तर पंढरपूर तालुक्‍यातील 35 गावे आणि पंढरपूर शहर असा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भगीरथ भालके महाविकास आघाडीकडून तर भाजपच्या वतीने समाधान आवताडे रिंगणात होते. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल ही आशा फोल ठरल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत उडी घेतली.

Awtade
कोण आहेत अखिल गोगोई? तुरुंगातून भाजपला देतायत टक्कर

या मतदार संघाची एकूण मतदार संख्या तीन लाख 40 हजार 889 एवढी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही या मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील यांसह अन्य मंत्र्यांनी वारंवार सभा घेतल्या. तर समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राम सातपुते, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनीही मतदारसंघ पिंजून काढला.

या निवडणुकीत एकूण 65.73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये मतदारांनी स्व. भारत भालके यांची आमदारकीची गादी भगीरथ भालके यांच्याकडेच सोपवली की मंगळवेढ्यातील 35 गावच्या पाणी प्रश्‍नासाठी मतदार समाधान आवताडे यांच्या बाजूने उभे राहिले, याचा फैसला उद्या होणार आहे.

विजयी मिरवणूक काढल्यास होणार कारवाई

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विजयी मिरवणूक काढण्यावर निर्बंध आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. मतमोजणी केंद्राबाहेर व पंढरपूर शहर, मंगळवेढा तालुक्‍यामध्ये पोलिसांचा पुरेशा प्रमाणात बंदोबस्त राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर

Awtade
भारतात प्रवास करू नका! इस्रायलचे नागरिकांना आदेश
  • सहाव्या फेरीअखेर काट्याची टक्कर दिसून आली. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 17412 तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना 17218 मते मिळाली असून, भगीरथ भालके 194 मतांनी पुढे आहेत

  • पाचव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 14717 तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना 14059 मते मिळाली असून, भगीरथ भालके 658 मतांनी पुढे आहेत.

  • चौथ्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 11941 तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना 11303 मते मिळाली असून, भगीरथ भालके 438 मतांनी पुढे आहेत.

  • सकाळी आठ वाजता पोस्टल मतांनी सुरू झाली मतमोजणी

  • मंगळवेढ्यातील 104 गावे तर पंढरपूर तालुक्‍यातील 35 गावे आणि पंढरपूर शहराच्या मतमोजणीसाठी वाजणार रात्रीचे आठ

  • कोरोनामुळे विजयी मिरवणूक काढण्यावर बंदी; पोलिस अधीक्षकांनी नेमला तगडा बंदोबस्त

  • मतमोजणीसाठी 160 कर्मचाऱ्यांची नियुक्ती; साडेतीन हजार आहेत पोस्टल मते

  • मतमोजणीच्या अनुषंगाने दोन एसआरपीएफ तर एक आरसीबीची तुकडी नियुक्त; मतमोजणी केंद्राच्या परिसरात 170 पोलिस अधिकारी व कर्मचारी

बातमीदार : तात्या लांडगे/अभय जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com