माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. दिल्लीतील निगम बोध घाटावर मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराची माहिती सरकारने काँग्रेस आणि कुटुंबीयांना दिली होती. मात्र आता निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने काँग्रेस नाराज असल्याचे बोलले जात आहे.