मोदी खोटारडे असल्याचे नागरिक सांगतात- राहुल

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

काळा पैसा परत आणण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. देशातील फक्त एक टक्के अतिश्रीमंत नागरिकांकडे काळा पैसा आहे. शेतकऱ्यांकडे काळा पैसा नाही. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

बेळगाव - परदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे असल्याचे नागरिक मला सांगत आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

बेळगाव येथे सभेत बोलताना राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. यापूर्वीही राहुल यांनी मोदींना या विषयावरून लक्ष्य केले आहे. 

राहुल गांधी म्हणाले, की काळा पैसा परत आणण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. देशातील फक्त एक टक्के अतिश्रीमंत नागरिकांकडे काळा पैसा आहे. शेतकऱ्यांकडे काळा पैसा नाही. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. भ्रष्टाचार किंवा काळा पैसाबाबत हा निर्णय असता तर काँग्रेसचा याला पाठिंबा असता. पण, हा नोटाबंदीचा निर्णय याबाबत नाही. उद्योगपती विजय मल्ल्या हा चोर आहे. तुम्ही त्यालाच 1200 कोटी रुपयांची टॉफी खाऊ घातली. त्याचे कर्ज कशामुळे माफ केले. इंग्रजीत 'मॅन मेड डिझॅस्टर' असे म्हटले जाते. तसेच नोटाबंदीमुळे झालेल्या हानीला मोदी जबाबदार आहेत. आतापर्यंत 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संसदेत मोदींनी शेतकऱ्यांची खिल्ली उडविली. मनेरगा हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असताना त्यांनी त्याची खिल्ली उडविली जाते.

Web Title: Congress Vice President Rahul Gandhi attacks Narendra Modi on demonetization issue