भाजपचा बालेकिल्ला ढासळला; काँग्रेसचा 14 वर्षांनी विजय

भाजपचा बालेकिल्ला ढासळला; काँग्रेसचा 14 वर्षांनी विजय

बळ्ळारी- बळ्ळारी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार व्ही.एस.उगरप्पा 243161 मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसचा भाजच्या बालेकिल्ल्यात झालेला हा मोठा विजय मानण्यात येत आहे. तब्बल 14 वर्षानंतर काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. भाजपाला हा मोठा फटका मानण्यात आहे. एवढ्या मोठ्या फरकाने झालेला विजय हा भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

या पोटनिवडणुकामध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून रेड्डी बंधुंचा आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बळ्ळारीमध्ये दोन लाख मतांपेक्षा जास्त मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. हा येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बळ्ळारीची जागा भाजपच्या श्रीरामलू यांनी राजीनामा दिल्याने रिकामी झाली होती. 

या निकालावर जेडीएसचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांनी 'अपवित्र मैत्री'लाच स्वीकारले असून भाजपला नाकारले आहे. हा काँग्रेस आणि जेडीएसच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. भाजपने आघाडीला 'अपवित्र मैत्री' म्हटले होते. आज यावर जनतेनेच स्पष्ट केले असल्याचे कुमारस्वामी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com