esakal | काँग्रेस बदलणार लोकसभेतील नेता
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi

काँग्रेस बदलणार लोकसभेतील नेता

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - काँग्रेसने (Congress) लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांन नारळ देण्याची तयारी सुरू केल्याचे कळते. काँग्रेसच्या संसदेतील रणनितीसंदर्भातील गटाची बैठक बुधवारी (ता. १४) सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) उपस्थितीत होणार असून यात नेता बदलाचा (Leader Change) निर्णय होऊ शकतो. मात्र, राहुल गांधींचे नाव या पदासाठी चर्चेत नसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. (Congress will Change Loksabha Leader Politics)

अधिवेशनास १९ जुलैपासून सुरुवात होत आहे. यात केंद्र सरकारला घेरण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पश्चिम बंगालमध्ये एकहाती भाजपला धोबीपछाड देणाऱ्या तृणमूल काँग्रेसला सोबत घेण्यासाठी काँग्रेस नेतृत्व आग्रही आहे. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेतील विद्यमान गटनेते अधीर रंजन चौधरी यांना बदलून तृणमूल काँग्रेसला सकारात्मक संदेश देण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा: मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या महिलेची तक्रार, दिल्ली HC ची माध्यम समुहांना नोटीस

त्या पार्श्वभूमीवर सूत्रांच्या म्हणण्यानुसार या पदासाठी मनीष तिवारी, शशी थरूर, आसाममधील गौरव गोगोई, पंजाबमधील रवनीतसिंग बिट्टू, तेलंगणाचे माजी प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी आदी नावांवर चर्चा सुरू आहे. अलिकडेच, या पदासाठी मनीष तिवारी यांचे नाव माध्यमांमध्ये झळकल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनीच गटनेतेपद सांभाळावे, अशी मागणी सुरू झाली होती. मात्र पक्षातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधींचे नाव या पदासाठी चर्चेत नाही.

अद्याप सूचना नाही

अधीर रंजन चौधरी यांच्या निकटवर्तींच्या म्हणण्यानुसार गटनेते पद सोडण्याबाबत चौधरी यांना पक्षाकडून अद्याप काहीही सूचना नाही. लोकसभेतील गटनेते पदासोबतच त्यांच्याकडे लोकलेखा समितीचेही अध्यक्षपद आहे.

loading image