esakal | मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या महिलेची तक्रार, दिल्ली HC ची माध्यम समुहांना नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

high court

मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या महिलेची तक्रार, दिल्ली HC ची माध्यम समुहांना नोटीस

sakal_logo
By
विनायक होगाडे

दिल्ली : दिल्ली हायकोर्टाने आता दिल्ली सरकार, दिल्ली पोलिस आणि काही माध्यम समूहांना नोटीस पाठवली आहे. उत्तर प्रदेशातील हिंदू महिला स्वेच्छेने मुस्लिम धर्म स्विकारू इच्छित आहे. मात्र, तिच्या या धर्मांतराबद्दल तिच्यावर आणि तिच्या कुटुंबियांबद्दल द्वेषपूर्ण तसेच हेतुपुरस्सर चुकीचा मजकूर माध्यमांमधून प्रसारित केला जात असल्याची तक्रार तिने केली होती. याबाबत हायकोर्टाने झी मीडिया, नवभारत टाईम्स आणि न्यूज ब्रॉडकास्टींग स्टँडर्ड्स ऑथॉरिटी (NBSA) ला नोटीस देण्यात आली आहे.

हेही वाचा: हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश; एजंटला गुजरातमध्ये जावून बेड्या

उत्तर प्रदेश राज्य दिल्ली हायकोर्टाच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्यामुळे न्यायाधीश रेखा पल्ली यांनी उत्तर प्रदेश सरकारला ही नोटीस पाठवण्यास नकार दिला आहे. ही महिला सध्या दिल्लीत राहते मात्र ती मूळात उत्तर प्रदेशची आहे. तिने स्वत:ला तसेच कुटुंबियांसाठी पोलिस संरक्षण मागितले आहे. तसेच माध्यमांनी या निर्णयाचा आणि खासगीपणाचा आदर राखत कसल्याही प्रकारचा द्वेषपूर्ण मजकूर प्रसारित न करण्याबाबतही तिने मागणी केली आहे. दिशा ए रवी विरुद्ध राज्य (दिल्ली एनसीटी) प्रकरणात उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे माध्यमांना आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: बापरे ! महाराष्ट्रातील 'या' पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढतोय, काळजी घ्या

2012 साली कोणत्याही धमकी किंवा बळजबरीशिवाय तिने स्वत: च्या स्वेच्छेने आणि कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न होता इस्लाम धर्मात आपले धर्मांतर केले होते आणि त्यानंतर धर्मांतरणाचे प्रमाणपत्र दिले गेले होते. मात्र यावर्षीच्या जूनपासून तिच्या या धर्मांतरावरुन तिला त्रास दिला जातो आहे.

loading image