esakal | काँग्रेसला 2020मध्येच मिळणार नवा अध्यक्ष?; निवडणूक प्रक्रियेला होणार सुरुवात  
sakal

बोलून बातमी शोधा

congress will get new elected president soon

काँग्रेस पक्षाची स्वतंत्र एक रचना आहे. पक्षात काँग्रेस कार्यकारिणीला प्रचंड महत्त्व आहे. पक्षाच्या नियमांनुसार 24 सदस्यांच्या कार्यकारिणीमध्ये 11 सदस्य निवडून जावे लागतात तर, 12 सदस्यांची नियुक्ती थेट पक्षाचे अध्यक्ष करतात.

काँग्रेसला 2020मध्येच मिळणार नवा अध्यक्ष?; निवडणूक प्रक्रियेला होणार सुरुवात  

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल? हा प्रश्न काँग्रेसच नव्हे तर काँग्रेसच्या विरोधकांनाही पडलाय. पण, अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार असून, येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार असून, त्यात या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा : कोरोनाचे संकट लवकरच जाणार हे सांगणारा अप्रतिम फोटो

निवडीच्या प्रक्रियेला गती 
काँग्रेस कमिटीचे (All India Congress Committee)अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस मुख्यालयात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक कार्यक्रमानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पडली तर, 2021च्या सुरुवातीलाच काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला असेल. काँग्रेसच्या 23 नेत्यांनी नव्या पक्षाध्यक्ष निवडी संदर्भात पाठविलेल्या लेटर बॉम्ब नंतर पक्षात नव्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवड प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करून, नोव्हेंबर अखेरपर्यंत ती पूर्ण करण्याचा निर्णय कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या संदर्भात कमिटीकडून निवड प्रक्रियेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात येणार आहे.  

आणखी वाचा - सुनेला बाहेर काढता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

काय आहे काँग्रेस कार्यकारिणी?
काँग्रेस पक्षाची स्वतंत्र एक रचना आहे. पक्षात काँग्रेस कार्यकारिणीला AICC प्रचंड महत्त्व आहे. पक्षाच्या नियमांनुसार 24 सदस्यांच्या कार्यकारिणीमध्ये 11 सदस्य निवडून जावे लागतात तर, 12 सदस्यांची नियुक्ती थेट पक्षाचे अध्यक्ष करतात. कार्यकारिणीमध्ये देशातील सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व असावे लागते. त्यासाठी पक्षाध्यक्षांचा कस लागतो. आता काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया कशी असेल याविषयी कमालिची उत्सुकता आहे. 

काय घडले?
2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याची जबाबदारी घेत तात्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी Rahul Gandhi यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी Sonia Gandhi यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची तात्पुरती सूत्रे देण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला होता. एक वर्ष उलटल्यानंतरही पक्षाध्यक्षांविषयी निर्णय होत नसल्या बद्दल पक्षातील काही नेत्यांनी 24 ऑगस्टच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी, 'पक्षाने सहा महिन्यांत नवीन अध्यक्ष निवडावा' अशा सूचना दिल्या होत्या.
 

loading image
go to top