esakal | सुंदर, अप्रतिम! कोरोना संकटातून लवकरच बाहेर पडू असं सांगणारा हा फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

new born baby & doctor

'मास्क खेचणारे बाळ' या कोरोना महामारीतून मानवजातीची सुटका करण्यासाठीचे आशेचे प्रतिक म्हणून ओळखले जात आहे. 

सुंदर, अप्रतिम! कोरोना संकटातून लवकरच बाहेर पडू असं सांगणारा हा फोटो

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मास्क वापरणे ही न्यू नॉर्मल गोष्ट आहे. मास्क आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात सतत धुणे, सोशल डिस्टंन्सिगचे  पालन आणि तोंड व नाक संपूर्ण झाकेल असा मास्क परिधान करणे अत्यावश्यक आहे. ही नवी गोष्ट आता सवयीची झाली असली तरीही ती त्रासदायक वाटतेच. कधी एकदा चेहऱ्यावरचा मास्क निघून जातोय आणि मोकळ्या हवेत श्वास घेता येतोय, अशी भावना सगळ्यांचीच आहे. या भावनेलाच मोकळी वाट करुन देत एक आशादायक वाटावं असा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच जन्म घेतलेलं बाळ डॉक्टरांचा मास्क ओढत आहे, असा आहे फोटो...

UAE च्या सामेर चेऐब या डॉक्टरांनी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केलाय. आपण लवकरच मास्क काढून टाकणार आहोत हे दाखवणारे हे प्रतिकच आहे, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. ब्लॅक एँड व्हाईट असलेला फोटो बाळाकडून नकळत झालेल्या कृतीमुळे आणखीनच आकर्षक आणि प्रभावी आहे. यामधील डॉक्टरांचा हसरा चेहरा आणि बाळाचं रडणं तसेच ब्लॅक एँड व्हाईट अशी फोटोची रचना यामुळे ही एक अर्थपूर्णता या फोटोला आली आहे. मास्क खेचणारे बाळ या महामारीतून मानवजातीची सुटका करण्यासाठीचे आशेचे प्रतिक म्हणून ओळखले जात आहे. 

हेही वाचा - USमधील बेरोजगारीचं खापर 'बायडेन'माथी, बायडेन जिंकले तर समजा चीन जिंकला

सध्या हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या फोटोविषयी बोललं जात आहे आणि तो लोकांकडून शेअर केला जात आहे. या फोटोवर लोक व्यक्त होतायत. आपली प्रतिक्रीय देत आहेत. लवकरच जग या महामारीवर विजय मिळवून पुर्ववत होईल, असा संदेशच या फोटोतून व्यक्त होतोय अशी प्रतिक्रीय बऱ्याच जणांनी दिली आहे. 

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, "मला सुपरमॅन झाल्यासारखं वाटतय"

फोटो ऑफ द ईअर! गॉड ब्लेस यू! काय अप्रतिम आणि अर्थपूर्ण फोटो आहे हा... सुंदर फोटो... आणि हो... आशा करुया की हा दिवस लवकरच येईल... अशा अनेक प्रतिक्रीया या फोटोवर आलेल्या आहेत.