
नाव न घेता राहुल गांधींनी भाजपला मारला टोमणा अन् नेत्यांना दिला दम
पक्षाच्या कोणत्याही नेत्याला काही समस्या किंवा तक्रार असल्यास ती तक्रार पक्षाच्या अंतर्गत व्यवस्थेत नोंदवा. तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही अंतर्गत व्यवस्थेत आवाज उठवा. मात्र, कोणी माध्यमांसमोर येऊन तक्रार नोंदवल्यास पक्षाची प्रतिमा डागाळते. हे खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्षाच्या नेत्यांना देशाअंतर्गत बाबी जनतेसमोर न नेण्याचा इशारा दिला आहे. (Congress will not tolerate those who tarnish the image of the party said by Rahul Gandhi)
हैदराबादमध्ये तेलंगणा प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीच्या बैठकीला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. काँग्रेस हे एक कुटुंब आहे. कुटुंबात प्रत्येकाची वेगवेगळी मते आहेत. आरएसएससारखं एक माणूस सर्वकाही ठरवतो, असे आपल्याकडे नाही आहे. आम्हाला प्रत्येकाचा आवाज ऐकायचा आहे. परंतु, मीडियातून नाही. बंद खोलीत कौटुंबिक चर्चा जशी होते तसं, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.
हेही वाचा: नशा न झाल्याने दारूमध्ये भेसळीचा संशय; दारुड्याने गृहमंत्र्यांकडे केली तक्रार
तक्रार असेल तर आमची अंतर्गत यंत्रणा आहे. तुमची जी काही तक्रार असेल, तिथे तुम्ही बोला. कोणी मीडियात बोलले तर तो पक्षाची प्रतिमा खराब करतो आणि आम्ही ते स्वीकारणार नाही, असेही राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.
पाच राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. संघटनेच्या नेतृत्वाबाबत पक्षात दोन गट पडले आहेत. एक गट पक्ष नेतृत्व म्हणजेच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पाठीशी आहे, तर दुसऱ्या गटाची इच्छा आहे की काँग्रेस गांधी घराण्यापासून मुक्त व्हावी. तसेच पक्षाचे नेतृत्व गैर-काँग्रेसच्या (Congress) हातात गेले पाहिजे.
Web Title: Congress Will Not Tolerate Those Who Tarnish The Image Of The Party Said By Rahul Gandhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..