
एका तरुणीचा मृतदेस सुटकेसमध्ये आढळून आल्यानं हरियाणातील रोहतक जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सांपला गावातील एका बस स्टॅंडमध्ये तरुणीचा मृतदेह असलेली सुटकेस सापडली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सुटकेस ताब्यात घेतली. फॉरेन्सिक लॅबचं पथक घटनास्थळी दाखल झालं. सुटकेस उघडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता.