
पत्नीच्या त्रासाला कंटाळून टीएस कंपनीचा मॅनेजर मानव शर्माने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आता मानव शर्माची पत्नी निकिता शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मानवच्या आत्महत्येच्या आधीचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. निकिता स्वत:ला चुकीचं असल्याचं सांगत आहे. तसंच लग्नाच्या आधी एका व्यक्तिसोबत रिलेशनशिपमध्ये होते असंही तिने व्हिडीओत सांगितलंय. याशिवाय तिने स्वत:च्या मामांवरही गंभीर आरोप केलेत.