esakal | मोदींच्या कौतुकानंतर काँग्रेस कार्यकर्ते भडकले; गुलाम नबी आझाद यांचा पुतळा जाळला

बोलून बातमी शोधा

kashmir gulam nabi azad}

जम्मूमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात निदर्शने करताना पुतळा जाळला आहे.

desh
मोदींच्या कौतुकानंतर काँग्रेस कार्यकर्ते भडकले; गुलाम नबी आझाद यांचा पुतळा जाळला
sakal_logo
By
टीम ई सकाळ

जम्मू - जम्मूमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात निदर्शने करताना पुतळा जाळला आहे. आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यानं भडकलेल्या कार्यकर्त्यांनी निदर्शन केलं. तसंच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या शेवटच्या दिवशी स्तुतीसुमने उधळली होती. त्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनी एका कार्यक्रमात मोदींचे कौतुक केले. तेव्हा आझाद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी किमान त्यांचे मूळ विसरले नाहीत. लोकांनी त्यांच्याकडून शिकायला हवं. यशाच्या शिखरावरसुद्धा त्यांनी आपला भूतकाळ लक्षात ठेवला. यावेळी आझाद यांनी मोदींनी चहा विकल्याच्या घटनेचा उल्लेख केला आणि म्हटलं की, त्यांनी स्वत:बाबतचं सत्य कधी लपवलं नाही.

हे वाचा - VIDEO - आसाममध्ये चहाचं राजकारण; प्रियांका गांधी पोहोचल्या थेट मळ्यात

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आझाद हे गुर्जर देश चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. तेव्हा त्यांनी म्हटलं की, कोणत्याही व्यक्तीने जगापासून स्वत:चं सत्य लपवू नये. मी स्वत: एका गावातून आलो आहे आणि याचा मला अभिमान आहे. मी आपल्या पंतप्रधानांसारख्या नेत्यांचे कोतुक करतो जे गावातून आले. ते चहा विकायचे. मोदींसोबत माझे राजकीय मतभेद असतील पण ते भूतकाळात चहावाला होते याबद्दल उघडपणे बोलतात असंही आझाद यांनी म्हटलं होतं.