काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या अडचणीत वाढ 

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने आरोपी म्हणून खटला चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शशी थरुर न्यायालयाने 7 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने आरोपी म्हणून खटला चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शशी थरुर न्यायालयाने 7 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे.

थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2014 मध्ये दिल्लीतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये त्यांच्या पत्नीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत मिळाला होता. सोशल मीडियावरील त्यांचे शेवटचे संदेश आणि ईमेलवरील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर केले आहे. गेल्याच महिन्यात सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांनी आपल्या पत्नीवर अत्याचार केला असल्याचे म्हटले होते.

थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूआधी एक आठवडा आपली जगण्याची आशा संपली आहे, अशा आशयाचा ईमेल केला होता असे पोलिसांनी सांगितले. सुनंदा या उदासीन होत्या त्यावेळी पती म्हणून थरुर यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्याचबरोबर त्यांच्यात वारंवार भांडणे होत असल्याचेही पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.

Web Title: Congress's Shashi Tharoor To Face Trial In Wife Sunanda Pushkar's Death