UP : शामलीत दंगल घडवण्याचा प्रयत्न; मंदिरात 11 ठिकाणी फेकले मांसाचे तुकडे

समाजकंटकांकडून वातावरण बिघडवण्यासाठी 11 ठिकाणी मांसाचे तुकडे फेकण्यात आले.
Shamli Uttar Pradesh
Shamli Uttar Pradeshesakal
Summary

समाजकंटकांकडून वातावरण बिघडवण्यासाठी 11 ठिकाणी मांसाचे तुकडे फेकण्यात आले.

यूपीच्या शामलीमधील (Shamli Uttar Pradesh) सिक्का गावात (Sikka Village) एका मंदिरात (Temple) मांसाचे (Meat) तुकडे फेकल्याची घटना समोर आलीय. यानंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. माहिती मिळताच संपूर्ण परिसरात मोठा पोलीस (UP Police) बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, सिक्का गावातील भोमिया खेडा परिसरात समाजकंटकांकडून वातावरण बिघडवण्यासाठी 11 ठिकाणी मांसाचे तुकडे फेकण्यात आले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. वास्तविक, समाजकंटकांनी शामली जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी सिक्का गावातील भोमिया खेडा परिसरात 11 ठिकाणी मांसाचे तुकडे फेकल्याचं प्रकरण समोर आलंय.

Shamli Uttar Pradesh
Shahaji Patil : 'शहाजीबापू संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, हेच कळत नाही'

यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलीय. त्याचबरोबर या घटनेनंतर शांतता राखण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आज (शनिवारी) सिक्का येथील भोमिया खेडा इथं हवन यज्ञ व पूजेसह संपूर्ण गावात प्रसाद वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हा सणही दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. शुक्रवारी समाजकंटकांनी भोमिया खेडा परिसरात 11 ठिकाणी मांसाचे तुकडे विखुरून वातावरण बिघडवलं. याशिवाय, भोमिया खेडाच्या मुख्य रस्त्यावरही मांसाचे तुकडे फेकण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रथम मांसाचे तुकडे काढले. यासोबतच ही घटना घडवून आणणाऱ्या समाजकंटकांचाही तपास सुरू करण्यात आला आहे.

Shamli Uttar Pradesh
POCSO न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांची आत्महत्या; पंख्याला गळफास लावून संपवलं जीवन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com