सहकाऱ्याच्या हल्ल्यात कॉन्स्टेबल गंभीर जखमी

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

मथुरा: कामाच्या नियमावरून झालेल्या बाचाबाचीनंतर सहकार्याने केलेल्या हल्ल्यात एक कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मथुरा: कामाच्या नियमावरून झालेल्या बाचाबाचीनंतर सहकार्याने केलेल्या हल्ल्यात एक कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

सदर बाजार पोलिस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल नेपाल सिंह याने एका कैद्याच्या कुटुंबीयांना खुर्चीवर बसून बोलण्याची परवानगी दिली. त्याला कॉन्स्टेबल सुरेंद्र सिंह याने हरकत घेतली आणि हा नियमांचा भंग आहे, असे सांगितले. या मुद्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर नेपाल सिंह याने सुरेंद्र सिंह याच्यावर एका वस्तूने हल्ला केला, त्यात तो गंभीर जखमी झाला. सुरेंद्र सिंह याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Constable seriously injured in a co-accused attack

टॅग्स