मोठी ब्रेकिंग : अयोध्येत राम मंदिर उभारणीला आजपासून सुरुवात.!

वृत्तसंस्था
Wednesday, 10 June 2020

राम मंदिर जन्मभूमीचा मुद्दा गेले अनेक वर्ष न्यायालयात प्रलंबित होता. अखेर प्रदिर्घ कायदेशीर लढाईनंतर अयोध्या येथे भव्य राम मंदिर निर्मितीच्या कार्याला मंजूरी देण्यात आली आहे.

लखनौ- अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाची सुरुवात पहिली विट ठेवून 10 जूनपासून होत आहे. त्याआधी भगवान शंकराची पूजा केली गेली आहे, अशी माहिती महंत कमल नयन दास यांनी दिली आहे. रावनाच्या लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी भगवान राम यांनी महादेवाची पूजा केली होती. महादेवाचा आशीर्वाद घेऊनच त्यांनी कार्याची सुरुवात केली होती. त्याप्रमाणे आम्हीही महादेवाचा रुद्राभीषेक करुन राम मंदिर निर्माणाचे कार्य हाती घेत आहोत, असं महंत म्हणाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राम मंदिर जन्मभूमीचा मुद्दा गेले अनेक वर्ष न्यायालयात प्रलंबित होता. अखेर प्रदिर्घ कायदेशीर लढाईनंतर अयोध्या येथे भव्य राम मंदिर निर्मितीच्या कार्याला मंजूरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महंत कमल नयन दास आणि अन्य साधू-संतांनी भगवान शशांक शेखर राम जन्मभूमी परिसरातील कुबेर टीला येथे असलेल्या भगवान शंकराची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली आहे. राम जन्मभूमी परिसराचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर मंदिर निर्माण कार्याचा शुभारंभ करण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांनी भगवान शंकराची पूजा केली.
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दोन दहशतवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात ११ ठार
-----------
धक्कादायक! आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू
----------
फेक बातम्यांच्या धर्तीवर सरकारच करणार आता फॅक्ट चेक; कसं ते वाचा?
-----------
बुधवारी राम जन्मभूमी परिसरात पहिली विट ठेवून निर्माण कार्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र, 2 जूलै पासून खऱ्या अर्थाने बांधकामाला सुरुवात होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राम जन्मभूमी परिसरात भगवान शंकराचे एक पुरातन मंदिर आहे. राम मंदिर निर्माण कार्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी शंकराची पूजा केली गेली आहे, असं साधू-सतांनी सांगितलं.

दरम्यान, राम मंदिर-बाबरी मशिद वादात सर्वोच्च न्यायालयाने विवादित जागा हिंदू पक्षकारांना दिली आहे. तसेच मुस्लीम पक्षकारांना अयोध्या परिसरात 2.7 एकर जागा देण्याचे सरकारला सांगितलं आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अयोध्या भूमिचा वाद निकाली लागला आहे. 10 मे रोजी मंदिराच्या जागेचे सपाटीकरण सुरु होते. यावेळी त्या जागेवर जुन्या मंदिराचे अवशेष सापडले आहेत.  पाच फुटाचे शिवलिंग, सात काळे खांब, सहा लाल मातीचे खांब आणि देवी-देवतांच्या तुटलेल्या प्रतिमा राम जन्मभूमीच्या स्थळी सापडल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction of Ram temple in Ayodhya starts from today!

Tags
टॉपिकस
Topic Tags: