हाथरस प्रकरणी योगी सरकारला दणका; हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाई

Yogi_Adityanath
Yogi_Adityanath

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हाथरस प्रकरणी मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. योगी सरकारने राज्यातील १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीणकुमार लक्षकार यांचा समावेश आहे. प्रवीणकुमार यांच्याकडे आता मिर्जापूरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या जागी उत्तर प्रदेश जल निगमचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक रमेश रंजन यांची नवे जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

१४ सप्टेंबरला हाथरस येथे उच्च जातीतील चार नराधमांनी दलित युवतीवर बलात्कार केला होता. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री तिच्यावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा प्रवीणकुमार चर्चेत आले होते. सदर युवतीच्या कुटुंबीयांनीही अंत्यसंस्कार जबरदस्तीने केल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकारही घडला होता. 

उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या तपासणीच्या निष्पक्षतेबाबत हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही कोणता आवाज उठवला नाही. कोणत्याच प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे प्रवीणकुमार यांच्या भूमिकेबाबत अलाहाबादच्या लखनऊ खंडपीठाने चिंता व्यक्त केली होती. 

प्रवीण कुमार यांच्याव्यतिरिक्त गोंडाचे जिल्हा दंडाधिकारी नितीन बन्सल यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना प्रतापगड येथे पाठविण्यात आले आहे. तसेच नोएडाच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रुती यांना बलरामपूरच्या नवीन डीएम म्हणून तर कृष्ण करुणेश यांची बलरामपूरच्या डीएम पदावरून गाझियाबाद विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणून बदली करण्यात आली आहे. याशिवाय फतेहपूरचे डीएम संजीव सिंह यांची चंदौलीच्या डीएमपदी बदली करण्यात आली आहे.

तसेच चिकित्सा शिक्षा विभागाचे विशेष सचिव मार्कंडेय शाही यांची गोंडाच्या जिल्हाधिकारीपदी, गाजियाबाद विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष कंचन वर्मांची उत्तर प्रदेश चिकित्सा आपत निगम लखनऊचे प्रबंध निदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे प्रतापगडचे जिल्हाधिकारी रुपेश कुमार यांची साखर आणि ऊस उत्पादक विकास विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com