Controversial Statement of TMC MLA: 'राम मंदिर अपवित्र ठिकाण, कोणीही अयोध्येला जाऊ नये...'; टीएमसी आमदाराचे वादग्रस्त विधान, Video Viral

Controversial Statement of TMC MLA: टीएमसी नेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते राम मंदिराबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत.
Controversial Statement of TMC MLA
Controversial Statement of TMC MLAEsakal

Controversial Statement of TMC MLA: पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय घडामोडी सुरूच आहेत. पण दरम्यान, राम मंदिराबाबत टीएमसी आमदाराने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत.

सोमवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदू सिन्हा रॉय यांनी एका रॅलीत बोलताना अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराचे वर्णन 'अपवित्र स्थळ' असे केले आहे. याबाबतचा त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

Controversial Statement of TMC MLA
Lok sabha Election: लालकृष्ण अडवाणी विरुद्ध राजेश खन्ना लोकसभा लढत; कोण जिंकलं? जाणून घ्या रंजक किस्सा

व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, 'मंदिर बांधले गेले आहे आणि कोणत्याही हिंदूने राम मंदिरात पूजा करण्यासाठी जाऊ नये.' टीएमसी नेत्याने पुढे म्हटले आहे की, 'जर पंतप्रधान मोदी ब्राह्मण नाहीत तर ते प्राणप्रतिष्ठा कसे करू शकतात?' टीएमसी आमदाराच्या या वक्तव्यावर सध्या टीएमसीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Controversial Statement of TMC MLA
Lebanon Attack on Israel: हमास पाठोपाठ लेबनॉनचाही इस्राइलवर हल्ला! एका भारतीयाचा मृत्यू, तर दोन जण जखमी

भाजपचा पलटवार

तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातील टीएमसी आमदार रामेंदू सिन्हा रॉय यांनी भव्य राम मंदिराला 'अपवित्र' म्हटल्यानंतर भाजपकडून ही प्रतिक्रिया आली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे, "ही टीएमसी नेत्यांची भाषा आहे. त्यांनी प्रभू रामाबद्दल TMC नेतृत्वाचा आदर दाखवला आहे."

भाजप नेत्याने सांगितले की, टीएमसी आमदाराच्या टिप्पणीमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.

Controversial Statement of TMC MLA
Lebanon Attack on Israel: हमास पाठोपाठ लेबनॉनचाही इस्राइलवर हल्ला! एका भारतीयाचा मृत्यू, तर दोन जण जखमी

ममता बॅनर्जींवर निशाणा साधला

शाळकरी मुलांना 'प्रशासकीय कार्यक्रमासाठी' बोलावल्याबद्दल भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की सीएम ममता बॅनर्जी पूर्व मेदिनीपूरमधील त्यांचे ठिकाण बहुतेक शाळकरी मुलांनी भरत आहेत.

Controversial Statement of TMC MLA
Gurgaon Restaurant: रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर 5 जणांना सुरु झाल्या रक्ताच्या उलट्या; नेमकं काय झालं? व्हिडिओ व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com