सीरमच्या लशीला आप्तकालीन मंजुरी मिळताच अदर पुनावालांनी केलं टि्वट

सकाळ ऑनलाइन टीम
Sunday, 3 January 2021

दोन्ही लशींच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन अभिनंदन केले आहे. त्यांनी या लशीसाठी प्रयत्न केलेल्या शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लशीबाबत खूशखबर मिळाली आहे. डीसीजीआयने सीरम इन्सिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला भारतात आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे. दोन्ही लशींच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन अभिनंदन केले आहे. त्यांनी या लशीसाठी प्रयत्न केलेल्या शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर सीरम इन्सि्टट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही याबाबत टि्वट करुन लशीला मान्यता मिळाल्याचे सांगत लवकरच सीरमची लस बाजारात उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

अदर पुनावाला यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. कोव्हिशील्ड भारतात मान्यता मिळालेली पहिली लस आहे. सुरक्षित आणि प्रभावी असलेली ही लस येत्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल.  

हेही वाचा- ब्रेकिंग न्यूज : प्रतिक्षा संपली; DCGI कडून Covishield आणि Covaxin ला मंजुरी

दरम्यान, दोन्ही लशींना आप्तकालीन मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी टि्वट केले. ते म्हणाले की, डीसीजीआयने सीरम इन्सिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. देशाचे अभिनंदन. आमच्या साऱ्या मेहनती वैज्ञानिक आणि नवीन संशोधकांचे मन:पूर्वक अभिनंदन.

दरम्यान, DCGI चे बी जी सोमानी यांनी म्हटलं की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून थोडेदेखील धोकादायक असलेलं आम्ही काहीही मंजूर करणार नाही. या लशी 100 % सुरक्षित आहेत. सौम्य ताप येणे, वेदना होणे आणि ऍलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य असतात. जर यावरुन लोक असंयम दाखवत असतील तर हे चुकीचं आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVISHIELD COVID 19 vaccine ready to roll out in the coming weeks says serum institute ceo adar poonawalla