Manmohan Singh : थेट मंत्री महोदयांशी झालेला वाद मनमोहन सिंगांसाठी ठरला आयुष्य बदलणारा टर्निंग पॉइंट, इंदिरा गांधींशी आहे कनेक्शन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित अनेक किस्से प्रसिद्ध
Manmohan Singh
Manmohan Singhesakal

Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास खूप रंजक राहिला आहे. प्रत्येक वेळी नशिबाने साथ दिली. सुरुवातीच्या काळात कोणाचंही ऐकून न घेण्याच्या आग्रहामुळे त्यांचा तोट्याऐवजी फायदाच झाला.

मनमोहन सिंग यांची विदेश व्यापार खात्यात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली त्या दिवसांची ही गोष्ट आहे. मनमोहन सिंग यांनी केंब्रिजमध्ये भारताच्या आयात आणि निर्यातीवर संशोधन केले होते. हे लक्षात घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. त्या काळात खात्याची कमान ललित नारायण मिश्रा यांच्याकडे होती. एकेकाळी ललित नारायण मिश्रा मनमोहन सिंग यांच्यावर नाराज होते. कॅबिनेटला पाठवलेल्या नोटशी ते सहमत नव्हते. यावरून त्यांचा मनमोहन सिंग यांच्याशी वाद झाला.

Manmohan Singh
Cleaning Tips : सणाच्या आधी कळकटलेले स्वीचबोर्ड असे करा चकचकीत, दिसतील एकदम नव्यासारखे!  

त्यानंतर मनमोहन सिंग म्हणाले की ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीवर परत जातील. सिंग तेव्हा दिल्ली विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते. ही घटना 1969-71 मधील आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सचिव पी.एन.हक्सर यांना या प्रकरणाची माहिती होती. त्यांनी मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली. या संभाषणात त्यांनी मनमोहन सिंग यांना ते कुठेही जात नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी मनमोहन सिंग यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

Manmohan Singh
Tech Tips : AI च्या मदतीने Hackers चा नवा डाव, मेसेज नाही तर आता थेट फोनच येणार, उचलला तर होईल मोठं नुकसान

अशाप्रकारे ललित नारायण मिश्रा यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांना बढती मिळाली. यानंतर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नरही होते. RBI मध्ये त्यांचा कार्यकाळ 16 सप्टेंबर 1982 ते 14 जानेवारी 1985 असा होता.

Manmohan Singh
Bridal Makeup Skincare Tips : परफेक्ट ब्रायडल मेकअप हवायं ? मग फॉलो करा हे स्किनकेअर रूटीन

मनमोहन सिंग पहाटे 4 वाजता आंघोळ करायचे.

मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित आणखी एक रंजक गोष्ट आहे. हे सुद्धा त्याच्या केंब्रिजच्या काळातील आहे. मनमोहन यांचे सुरुवातीचे आयुष्य गावातच गेले. गावातील लोक पहाटे आंघोळ करतात. मनमोहन सिंग यांनी इंग्लंडला जाऊनही ही सवय बदलली नाही. कडाक्याच्या थंडीतही ते रोज पहाटे 4 वाजता आंघोळ करत असत. या गोष्टीचं त्यांच्या मित्रांना खूप आश्चर्य वाटायचं.

Manmohan Singh
Skin Care Tips कोरियन तरुणींसारखी हवीय सुंदर त्वचा? मग आठवडाभर करा हा उपाय

मनमोहन सिंग फार कमी बोलायचे. याच कारणामुळे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात विरोधकांनीही त्यांना 'मूक' पंतप्रधान म्हटलं होतं. पण, त्यांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी नेहमीच निर्दोष राहिली. ते अतिशय लाजाळू आणि शांत स्वभावाचे असल्याचे संजय बारू यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com