रेल्वे प्रवासात आता लवकरच शॉपिंगची सुविधा

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नवी दिल्ली - आता लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांसाठी शॉपिंगची सेवा सुरू होणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, यासाठी एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. एवढेच नाही तर प्रवासी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड अथवा कॅश देऊन शॉपिंग करु शकतील. 

जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू होणार आहे. एकूण आठ टप्प्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येईल. प्रत्येक टप्प्यात दोन ट्रेनमध्ये सेवा सुरू होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सौंदर्यप्रसाधने, घरातील आणि किचनमधील साहित्य आणि फिटनेसचं साहित्य इत्यादी वस्तू ट्रेनमध्ये विकण्याची परवानगी असणार आहे. 

शताब्दी आणि राजधानी सारख्या गड्यांमध्ये या प्रकारची सुविधा रेल्वेने याआधीच सुरु केली आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद बघता ही सुविधा इतर गाड्यांमध्येही देण्यात येणार आहे. 

Web Title: The convenience of shopping soon in the train journey