अधिवेशनात मराठी खासदारांची कामगिरी लक्षवेधी

सुप्रिया सुळे, गिरीश बापट आघाडीवर; कोविड, हवामान बदलावर सर्वाधिक चर्चा
Supriya Sule Girish Bapat
Supriya Sule Girish Bapatsakal

नवी दिल्ली : संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारणे, शून्य प्रहर किंवा विशेष उल्लेखाद्वारे जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे मांडणे, खासगी विधेयके, चर्चांमध्ये सहभाग घेणे आणि उपस्थिती या आघाड्यांवर मराठी खासदारांनी लक्षवेधक कामगिरी केली आहे.

Supriya Sule Girish Bapat
गोवा राजकीय प्रयोगासाठीची लॅब नाही; भाजपचा आप-TMCवर निशाणा

राहुल शेवाळे, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट, डॉ श्रीकांत शिंदे यांची कामकाजाची टक्केवारी ठसठशीत आहे. राज्यसभेतही डॉ. फौजिया खान, डॉ विनय सहस्रबुद्धे, रजनी पाटील आणि वंदना चव्हाण यांची कामगिरी लक्षणीय ठरली आहे. निलंबित खासदारांचा विषय काढताक्षणी संबंधित सदस्यांचा माईकच बंद करून टाकला जातो, हा विरोधकांचा अनुभव असला तरी डॉ. खान, पाटील आणि चव्हाण यांनी त्यातही जोरकसपणे मुद्दे मांडले. जेवढे दिवस कामकाज झाले त्यात लोकसभा व राज्यसभेच्या मराठी खासदारांनी लक्षणीय कामगिरी केली.

पेगासस हेरगिरी प्रकरण, १२ विरोधी खासदारांचे निलंबन, लखीमपुर-खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना भाजप नेतृत्वाकडून मिळणारे अभय आधी मुद्द्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे गाजलेल्या या सलग दुसऱ्या अधिवेशनात मुळातच कामकाजाचे २० दिवस होते. त्यातही १८ दिवसच कामकाज चालले.

Supriya Sule Girish Bapat
मुंबईत कोरोनाचा उद्रेक; नव्या रुग्णांनी साडेपाच हजारांचा टप्पा गाठला!

लोकसभेत १८ तास ४८ मिनिटे व राज्यसभेत तर ४९ तास ३२ मिनिटे गदारोळामुळे पाण्यात गेले. लोकसभेत सरकारचे बहुमत असल्याने कामकाजाची टक्केवारी ८२ इतकी राहिली. राज्यसभेत मात्र हे प्रमाण ४७.९० टक्क्यांवर घसरले व ४९ तास ३२ मिनिटे (५२.०८ टक्के) इतका वेळ गदारोळामुळे काम झाले नाही.

कोविड, हवामान बदलावर चर्चा

अधिवेशनात कोविड-१९ हवामान बदल या विषयांवर १२ तासांपेक्षा जास्त दीर्घ चर्चा झाली. राज्यसभेतही अधिवेशनाच्या मधल्या दोन आठवड्यांचे अखेरचे दोन दिवस कामकाज झाले. डॉ सहस्रबुद्धे यांनी ऐतिहासिक वारसा स्थळांच्या विषयावर सादर केलेल्या खासगी विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली.

अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थिती नोंदविणारे सुप्रिया सुळे, बारणे, डॉ. खान, महात्मे, चव्हाण आणि जावडेकर हे मराठी खासदार आहेत. संसदेत कमी बोलणाऱ्यांत महास्वामी जयसिद्धेश्वर, इम्तियाज जलील, सुनील मेंढे, पी. चिदंबरम आदींचा समावेश आहे. ज्यांचे निलंबन हे सर्व पक्षांसाठी आश्चर्यकारक ठरले असे शिवसेना नेते अनिल देसाई यांच्यासह प्रफुल्ल पटेल, हेमंत पाटील आदींनी अत्यंत कमी उपस्थिती नोंदविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com