खासगी, सरकारी रुग्णालये कोविडसाठी; दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा निर्णय

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने दिल्ली सरकारने युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. आता खासगी रुग्णालये आणि सरकारी रुग्णालये ही पूर्णत: कोविड रुग्णालयांमध्ये रूपांतरित केली जाणार असून, बेडची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या तीन दिवसांपासून स्वत: राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. बस, मेट्रोमध्ये केवळ ५० टक्के क्षमतेने प्रवेश देण्याचा आदेश त्यांनी जारी केला आहे. गेल्या चोविस तासांत दिल्लीत १० हजार ७७४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आजही त्यांनी सचिवालयात बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालये बनविताना सरकारी रुग्णालयांमध्ये शक्य तेवढ्या बेडची संख्या वाढविण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यांनी जनतेलाही आवाहन केले आहे. कोविड नियमांचे कसोशीने पालन करा. त्याशिवाय कोरोनाला रोखता येणार नाही, असे सांगत त्यांनी लोकांना गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. कोविडचे निदान झाले असेल आणि कोणताही त्रास वाटत नसेल, तर रुग्णालयांमध्ये दाखल होण्याची घाई करू नका. तसेच लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असले, तरी रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे चित्र या बैठकीत मांडण्यात आले. त्यानंतर तत्काळ बेडची संख्या वाढविण्याचे निर्देश केजरीवाल यांनी दिले आहेत. तसेच दिल्लीत केंद्र सरकारची रुग्णालये आहेत, तिथेही बेडची संख्या वाढविण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात येणार आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेडची संख्या चौपट

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले, की गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील रुग्णालयांमध्ये १८ हजार बेड तयार केले होते. तशीच तयारी आम्ही आता सुरू केली आहे. केंद्र सरकारला देखील त्यांच्या नियंत्रणाखालील रुग्णालयांमध्ये बेड वाढविण्याची विनंती केली आहे. त्या रुग्णालयांमध्ये सध्या एक हजार ९० कोविडचे बेड आहेत, ते चार हजारांपर्यंत वाढविण्याची विनंती आम्ही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com