गोव्याच्या राजभवनातील स्वयंपाक बायोगॅसवर 

अवित बगळे 
शुक्रवार, 6 जुलै 2018

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या राजदूत म्हणून नियुक्त केलेल्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी कचऱ्यापासून बायोगॅस सयंत्र राजभवन परिसरात बसवून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. गोवा ऊर्जा विकास यंत्रणेच्या माध्यमातून या बायोगॅस सयंत्राची उभारणी राजभवनात झाली असून त्यातून निर्माण होणाऱ्या वायूवर स्वयंपाक करणेही सुरु झाले आहे. अर्थात याचे औपचारीक उद्‌घाटन होणे बाकी आहे. 

म्हापसा येथील आझिलो इस्पितळात असेच सयंत्र गेल्या वर्षी "गेडा'ने उभारले होते. हे दुसरे सयंत्र आहे. राजभवनात सौर पॅनलद्वारे वीज निर्मिती केल्यानंतर राज्यपालांनी ऊर्जा बचतीसाठी हे दुसरे पाऊल टाकले आहे. तीन घनमीटर क्षमतेचा हा पथदर्शी असा प्रकल्प आहे. त्यात दररोज 10किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया होते. त्यातून 1 किलो स्वयंपाकासाठीच्या वायूची निर्मिती होते, त्याशिवाय जैव खताची निर्मिती होते.त्याचा वापर राजभवनावरील बगिच्यांत केला जात आहे. 

राजभवनातील स्वयंपाकघर आणि राजभवन संकुलातील निवासी गाळ्यांतील स्वयंपाकघरातून हा ओला कचरा संकलीत करण्यात येत आहे. या प्रकल्पाची आणखीनही ओला कचरा सामावून घेण्याची क्षमता असली तरी राजभवनातून सध्या 10 किलो ओला कचऱ्याचीच निर्मिती होत असल्याने तेवढाच कचरा वापरण्यात येत आहे. 

या बायोगॅस सयंत्रातून बाहेर पडणारे खत हे उत्तम गुणवत्तेचे आहे का याची चाचणी जुनेगोवे येथील भारतीय कृषी संशोधन परीषदेच्या संकुलात करण्यात आली आहे. त्यात हे खताची मात्रा उत्तम असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ऍनारोबिक डायजेस्टर प्रकारचे हे बायोगॅस सयंत्र आहे. 

Web Title: cooking on bio gas in goa rajbhavan