esakal | अंगावर बसून पोलिसाची महिलेला मारहाण; सोशल मीडियावर संताप
sakal

बोलून बातमी शोधा

up

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी एका महिलेच्या अंगावर बसून तिला मारहाण करताना दिसत आहे.

अंगावर बसून पोलिसाची महिलेला मारहाण; सोशल मीडियावर संताप

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

लखनऊ- सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी एका महिलेच्या अंगावर बसून तिला मारहाण करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातील हा प्रकार आहे. 'इंडिया टूडे'ने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Cop sits on woman thrashes her in UP Kanpur Dehat Video goes viral social media)

पोलीस अधिकाऱ्याचे नाव महेंद्र पटेल असल्याचं कळत आहे. महेंद्र पटेलने महिलेला खाली पाडले आणि त्यानंतर अंगावर बसून तिला मारहाण केली. पोलीस आरोपी सुरजित यादव याच्या घरी गेले होते. यावेळी कुटुंबियांकडून पोलिसांना विरोध झाला. घरातील महिलांनीही पोलिसांना विरोध केला. पोखरयान स्टेशनचे प्रभारी महेंद्र पटेल चार हवालदारांना सोबत घेऊन गावात पोहोचले होते. त्यांच्यासोबत महिला पोलीस नव्हती.

हेही वाचा: HBD'देसी गर्ल'; प्रियांका आहे इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या खास गोष्टी

पीडित महिलेने पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. रिपोर्टनुसार, पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न नातेवाईकांकडून झाला. आरोपीच्या आईने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी आईला मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी पीडित महिला आरती आपल्या सासूला वाचवण्यासाठी मध्ये पडली. त्यावेळी महेंद्र पटेल याने पीडित महिलेला खाली पाडले आणि तो तिच्या अंगावर बसला. त्याने पीडितेला मारहाण केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: नेता, नेतृत्व आणि बंडखोरी!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आरोपीची चौकशी करण्यासाठी गावात पोहोचले होते. त्यावेळी आरोपीच्या कुटुंबियांनी पोलिसांना अडवण्याचा आणि कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांच्या या वागणुकीवर सोशल मीडियावर टीका होत आहे. या प्रकरणात तपास करण्याचे आदेश देण्यात आली आहे.

loading image