हरियाणात 12 जानेवारीपर्यंत कडक निर्बंध; शाळा, महाविद्यालयासह GYM बंद

पाच जिल्ह्यात संध्याकाळी पाज वाजेपर्यत माॅल आणि मार्केट सुरु
Corola
Corola Sakal

देशभरात कोरोना (Corona)रुग्णांची संख्या वाढत असतानाच ओमिक्रॉनने(Omicron Variant)डोके वर काढले आहे. कोराना निर्बंध कडक (Corana Restrictions)करण्यात आले असून, आता हरीयाणात (Hariyana) पाच जिल्ह्यात चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये, जिम बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेण्यात आला आहे. १२ जानेवारी पर्यंत हे निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. लस नसल्यास सेवा देऊ नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या जिल्ह्यात आहेत निर्बंध

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे हरियाणा सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. यात गुरुग्राम, फरीदाबाद, पंचकुला, अंबाला आणि सोनीपत या जिल्ह्यांचा समावेश आहे. आदेशानंतर या जिल्ह्यात शाळा - काॅलेज बंद ठेवण्यात आले आहेत. या पाच जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यतच माॅल आणि मार्केट सुरु राहतील.

Corola
PM Kisan चा 10 वा हप्ता बँक खात्यात जमा आहे का? असे करा Status चेक

विवाहसोहळा आणि इतर कार्यक्रमांसाठी केवळ १०० लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा आदेश २ जानेवारी ते १२ जानेवारीपर्यंत असेल. शाळा- काॅलेज सरकारने चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये, जिम, स्विमिंग पुल, पार्क बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती राहण्याचे आदेश दिले आहेत. हे निर्बंध १२ जानेवारीपर्यंत लागू राहतील.

भारतात गेल्या २४ तासात देशात तब्बल २७ हजार ५५३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात २८४ जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांची संख्या १५२५ इतकी झाली आहे. देशातील एकूण १५२५ ओमिक्रॉन बाधितांपैकी ५६० जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू लागू आहे. तर महाराष्ट्रात काही निर्बंधसुद्धा लागू केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com