PM Kisan चा 10 वा हप्ता बँक खात्यात जमा आहे का? असे करा Status चेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Kisan Scheme

PM Kisan चा 10 वा हप्ता बँक खात्यात जमा आहे का? असे करा Status चेक

नविन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता (PM Kisan Scheme 10th Installment) शनिवारी जाहीर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान योजने अंर्तगत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. शनिवारी काल रात्री(ता.१) काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. यात महाराष्ट्र आणि ओडिसा राज्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.

मात्र यात उत्तर प्रदेश राज्य मागे आहे. युपीमध्ये आतापर्यत ८२ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. तर राजस्थानमध्ये ९३ , गुजरातमध्ये ८६ शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रूपयांचा 10 वा हप्ता जमा झाला आहे. याचबरोबर जम्मू-कश्मीरात ७४, छत्तीसगढ़ ७८, आंध्र प्रदेश ७७ तर केवळ तमिळनाडुत ७६ टक्के शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचले आहेत.जर तुमच्या रेकॉर्डमध्ये काही अडचण असेल तर खात्यावर जर पैसे जमा होणार नाहीत. यासाठी तुम्ही सतत स्टेटस चेक करायला हवं. कसे चेक करायचे जाणून घेऊया.

असे करा स्टेटस चेक

पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही हे तपासण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. ते म्हणजे या योजनेची वेबसाइट. (pmkisan.gov.in) यामध्ये सरकारने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिली आहे. फक्त त्याच्या 'फार्मर कॉर्नर' वर जाऊन, तुम्ही तुमचे बँक खाते, मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड क्रमांक यापैकी कोणताही एक क्रमांक टाकल्यानंतर डिटेल्स तुमच्यासमोर येतील.

जर तुमच्या खात्यात पैसे जमा नाही झाले तर स्टेटसमध्ये एफटीओ (FTO-Fund Transfer Order) असं लिहलेले असेल तर पैसे जमा होतील. जर असं लिहलेल नसेल तर रेकाॅर्डमध्ये काहीतरी गडबड आहे अस समजा. यासाठी साइटवर जाऊन तुमच नाव, आधार क्रमांक नंबर स्पेलिंग चेक करा. कारण आधार व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत.

हेही वाचा: गोव्यात पुन्हा BJP ची सत्ता येऊ दे ; मुख्यमंत्र्यांनी घातले अंबाबाईला साकडे

कोणत्या शेतकऱ्याचे पैसे मिळणार नाहीत

तुम्हाला जर तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर (pmkisan.gov.in) या वेबसाइटवर ‘फार्मर कार्नर’ में Beneficiary List वर क्लिक करा. यात तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका जिसेल यात तुमच्या गावाचे नाव टाका. यानंतर Get Report वर क्लिक करा.तुम्हाला माहिती मिळून जाईल.

टोल फ्री क्रमांक क्रमांकावर करा कॉल

जर तुमच्या खात्यात प्रधानमंत्री किसान योजने अंर्तगत पैसे जमा झाले नसेल तर तक्रार करण्यासाठी काही टोल फ्री क्रमांक देण्यात आले आहेत. यावर संपर्क साधू शकता.

  1. टोल फ्री नंबर : 18001155266

  2. हेल्पलाइन नंबर : 155261

  3. लॅन्डलाइन नंबर : 011—23381092, 23382401

  4. नवीन हेल्पलाइन : 011-24300606

  5. हेल्पलाइन : 0120-6025109

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top