स्वदेशी Corbevax लस सुरक्षित, अँटिबॉडिजची उच्च पातळी - NTAGI

कोवोव्हॅक्स नंतर आता १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कॉर्बोव्हॅक्स ही लस उपलब्ध असणार आहे.
Corbevax corona vaccine for 12 to 18 years old in India
Corbevax corona vaccine for 12 to 18 years old in India

नवी दिल्ली : भारताची तिसरी स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस Corbevax (कॉर्बेव्हॅक्स) सुरक्षित असून यामध्ये चांगली प्रतिकारशक्ती असून इतर व्हिक्टर लसींपेक्षा उच्च अँटिबॉडीजची पातळी असल्याचा दावा नॅशनल टेक्निकल अॅडव्हाझरी ग्रुप ऑन इम्युनिझेशनचे (NTGI) अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी केलं आहे. (Corbevax COVID vaccine is safe offers high antibody levels NTAGI chief)

ड्रग्ज कन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ समितीनं कॉर्बेव्हॅक्स लसीला १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आपत्कालिन वापराला मंजुरी दिल्यानंतर NTGIच्या प्रमुखांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. DCGI कडून लवकरच या दोन डोसच्या लसीला अंतिम मंजुरी देण्यात येईल.

Corbevax corona vaccine for 12 to 18 years old in India
ड्रग माफिया, सोनं तस्करांशी संजय राऊतांचा संबंध: मोहित कंबोज

अरोरा म्हणाले, प्रोटिन सबयुनिट लस या सुरक्षित लस आहेत. या लसमध्ये चांगली प्रतिकारशक्ती असून व्हेक्टर लस आणि एम आरएनए लसींच्या तुलनेत या लसीविरोधात कमी तक्रारी आहेत. तसेच इतर व्हेक्टर लसींपेक्षा या लसमध्ये अधिक अँटिबॉडीज आहेत.

Corbevax corona vaccine for 12 to 18 years old in India
भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच राहील; सोमय्यांचा राऊतांवर पलटवार

कॉर्बेव्हॅक्स ही एक प्रोटिन सबयुनिट लस असून सध्या आपल्याकडे जी 'हेपेटायटिस बी' साठीची लस वापरली जाते ती प्रोटिन सबयुनिट लस आहे. कॉर्बेव्हॅक्सच्या मंजुरीनंतर आता भारताकडे १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी सीरमची कोवोव्हॅक्स आणि कॉर्बोव्हॅक्स या दोन स्वदेशी लस उपलब्ध झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com