Corona Updates: रुग्णसंख्या वाढीला जोर; दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

corona
corona

नवी दिल्ली: मागील 24 तासांत कोरोनाच्या 45 हजार 576 रुग्णांचं निदान झालं असून 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही वाढ कोरोनाबद्दल धोक्याचा इशारा देत आहे, असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. कारण मागील काही दिवसांत कोरोनाची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली गेली होती. आता ती पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 89 लाख 58 हजार 484 झाली असून एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 31 हजार 578 वर गेला आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत देशात 83 लाख 83 हजार 603 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील 24 तासांत देशात 48 हजार 493 जणांना डिस्चार्ज दिला आहे.

 
देशातील कोरोनाचे (COVID19) सक्रिय रुग्ण 5 लाखांच्या खाली गेले आहेत. सध्या देशात 4 लाख 43 हजार 303 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मागील 24 तासांत कोरोनाचे सक्रिय रुग्ण 3 हजार 502 ने कमी झाले आहेत. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.

बुधवारी एका दिवसात कोरोनाच्या 10 लाख 28 हजार 203 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात 12 कोटी 85 लाख 8 हजार 389 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने ( Indian Council of Medical Research) दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com